कोल्हापूर : समाजात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या सहाजणांना ‘महाराष्ट्र हिंदू मावळा’ व ‘कोल्हापूर जिल्हा हिंदू मावळा’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन व भगवा फेटा परिधान करून सन्मानित करण्यात आले.स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अखिल भारत हिंदू महासभेतर्फे शाहू स्मारक भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी स्वरदर्पण प्रस्तुत दिग्दर्शक हेमंत वाठारकर यांचा ‘गाणे मनातले’ या देशभक्ती गीत व सावरकर यांच्यावर आधारित गीतांचा कार्यक्रम झाला. गाणे मनातले या कार्यक्रमातून देशभक्तीचा जागर करण्यात आला.याप्रसंगी दिग्दर्शक यशवंत भालकर, बांधकाम उद्योजक एस.एन.पाटील व हिंदू महासभेचे प्रदेश संघटक संजय कुलकर्णी यांना ‘महाराष्ट्र हिंदू मावळा’ तर जिल्हाध्यक्ष प्रमोद घोरपडे, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सुवर्णा पवार, करवीर तालुका अध्यक्ष तुकाराम पाटील यांना ‘कोल्हापूर जिल्हा हिंदू मावळा’ पुरस्कार वैद्य प्रदीप भिडे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी मारुती मिरजकर, नगरसेवक ईश्वर परमार, सुभाष पोतदार, सुनील सामंत, संग्रामसिंह गायकवाड,धर्माजी सायनेकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.संयोजन जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हाध्यक्षा दीपाली खाडे, राजेश मेथे, राजेंद्र शिंदे, शहराध्यक्ष मनोहर सोरप, सरोज फडके, जयवंत निर्मळ, दिलीप कुलकर्णी, बबन हरणे, मनीषा पोवार, रेखा दुधाणे, आदींनी केले होते.