शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

कोल्हापूरच्या कलाकारांच्या दोन लघुपटांचा आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 11:31 AM

कोल्हापूर येथील सेव्हन सेकंद कलेक्टिव्हने निर्मिती केलेल्या ‘नाऊ युवर होम’ आणि ‘अडगळ’ या दोन लघुपटांना दोन वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत पुरस्कार मिळाला आहे. या दोन्ही लघुपटांचे दिग्दर्शन कोल्हापूरचा युवा कलाकार प्रसाद महेकर याने, तर छायांकन प्रशांत सुतार याने केले आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या कलाकारांच्या दोन लघुपटांचा आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवनाउ युवर होम आणि अडगळला दोन पुरस्कार

कोल्हापूर : येथील सेव्हन सेकंद कलेक्टिव्हने निर्मिती केलेल्या ‘नाऊ युवर होम’ आणि ‘अडगळ’ या दोन लघुपटांना दोन वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत पुरस्कार मिळाला आहे. या दोन्ही लघुपटांचे दिग्दर्शन कोल्हापूरचा युवा कलाकार प्रसाद महेकर याने, तर छायांकन प्रशांत सुतार याने केले आहे.केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत ‘सीएमएस वातावरण २०१९’ आयोजित दहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘नाऊ युवर होम’ या लघुपटाला प्रोफेशनल फिल्ममेकर्स अ‍ॅँड फिल्म स्टुडिओज या विभागात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार देण्यात आला.

नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे ३० नोव्हेंंबर रोजी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रवी अग्रवाल आणि सहसचिव मंजू पांडे यांच्या हस्ते प्रसाद महेकर आणि प्रशांत सुतार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दोन लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.गोव्यात झालेल्या सुवर्णमयी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिनी मूव्ही मेनिया शॉर्टफिल्म स्पर्धेतही ‘अडगळ’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट आणि सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी पुरस्कार मिळाले. २९ नोव्हेंबर रोजी पणजीत मॅकेनीज पॅलेस येथे झालेल्या वितरण सोहळ्यात प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि अनुक्रमे एक लाख रुपये तसेच २५ हजार रुपयांचे पारितोषिक महेकर आणि प्रशांत सुतार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

या लघुपटाची कथा, दिग्दर्शन आणि संकलन प्रसाद महेकर यांनी केले असून, छायांकन व कलादिग्दर्शन प्रशांत सुतार यांनी केले आहे. या लघुपटात जयप्रकाश परुळेकर, सागर खुर्द आणि आसावरी नागवेकर-पोतदार यांनी भूमिका केल्या आहेत; तर स्नेहल शिंदे, सिद्धान्त अथणे आणि अरिहंत भिवटे यांचे साहाय्य आहे.‘सेव्हन सेकंद कलेक्टिव्ह’ या संस्थेमार्फत महेकर आणि सुतार हे युवा कलाकार गेली सहा वर्षे चित्रपट आणि चित्रकलेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर