कोल्हापूर : मोबाईलवर बोलत दुचाकीवरून जात असताना रोखल्याने दोघा तरुणांनी वाहतूक पोलिसाशी रस्त्यावर हुज्जत घालत धमकी दिली.
या प्रकरणी या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी संशयित महेश पांडुरंग पाटील व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी (दि. ११) घडली. दोघेही पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.अधिक माहिती अशी, शहर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र मोहन कलगुटकर (वय ४५) हे सीपीआर चौकात बंदोबस्ताला होते. यावेळी एक तरुण दुचाकीवरून (एमएच ०९ एएक्स ६२५१) वरून मोबाईलवरून बोलत निघाला होता. त्याला अडवून दंड भरण्यास कलगुटकर यांनी सांगितले.
यावेळी त्याने मित्र संशयित महेश पाटील याला बोलावून घेतले. त्याने ‘माझी दुचाकी आहे, ती घेऊन जातोय. दंड भरणार नाही. तू जोतिबाला ये, तुला दाखवितो,’ अशी धमकी देत कलगुटकर यांच्याशी हुज्जत घातली.
यावेळी संबंधित तरुणाने मोबाईलवर त्याचे शुटिंग केले. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलगुटकर यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली.