शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

कोल्हापुरातील इचलकरंजीत राष्ट्रवादीला खिंडार, शहराध्यक्षासह तिघांचा शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 12:25 PM

आमदार प्रकाश आवाडे यांच्या भाजप प्रवेशाची पुन्हा चर्चा

इचलकरंजी : येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, सरचिटणीस व एका माजी नगरसेविकेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेचे धनुष्यबाण हातात घेतले. त्यामुळे शहरातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.प्रकाश पाटील हे आठ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदावर कार्यरत होते. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका अनिता कांबळे व सरचिटणीस बाजीराव कुंभार यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. कोल्हापूर येथील गंगावेश येथे झालेल्या एका कार्यक्रमप्रसंगी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

शिवसेनेचा स्कार्फ घालून त्यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख रवींद्र माने आदींची उपस्थिती होती.माजी नगरसेवक पाटील यांची राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते म्हणून ओळख होती. दोन वेळा ते इचलकरंजी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मात्र, गेल्या काही काळापासून ते नाराज असल्याची चर्चा होती. रविवारी त्यांनी अचानक पक्षाच्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे देत असल्याचे सोशल मीडियातून जाहीर केले. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश झाला.दरम्यान, हेरवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत सदस्या छाया सूर्यवंशी, ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख माधुरी साखरे, कनवाडच्या ग्रामपंचायत सदस्या आसमा पटेल यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याचे जिल्हाप्रमुख माने यांनी सांगितले.आवाडे भाजप प्रवेशाची पुन्हा चर्चाकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू होती. याबाबत खातरजमा सुरू होती, तोपर्यंत राहुल आवाडे व मौश्मी आवाडे हे दोघेही भाजपमध्ये जात असल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित झाली. त्यामुळे पुन्हा चर्चेला जोर चढला. सोशल मीडियावरून मेसेज, तसेच फोन करून चौकशी सुरू झाली. यापूर्वी सोशल मीडिया ट्रायलमध्ये लोकसभेचे उमेदवार म्हणून चर्चा झाली होती. त्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला महत्त्व होते; परंतु आवाडे परिवारातील कोणाचाच पक्षप्रवेश झाला नसल्याचे सांयकाळी स्पष्ट झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस