शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

कोल्हापूर : सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी वैचारिक बैठक, चर्चेतून ठरविणार पुढील दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 6:04 PM

मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातील शिफारशींबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी (दि. १५) वैचारिक बैठक आयोजित केली आहे. सायंकाळी पाच वाजता मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठक होणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे उमेश पोवार आणि विनोद साळोखे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसकल मराठा समाजातर्फे गुरुवारी वैचारिक बैठकचर्चेतून ठरविणार पुढील दिशा; सुमारे एक हजार बांधव सहभागी होणार

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातील शिफारशींबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी (दि. १५) वैचारिक बैठक आयोजित केली आहे. सायंकाळी पाच वाजता मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठक होणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे उमेश पोवार आणि विनोद साळोखे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.उमेश पोवार म्हणाले, आरक्षणाबाबत मराठा समाजाचे कोल्हापुरातील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेताना मंत्री गट उपसमितीने १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येईल. हा अहवाल येण्यापूर्वी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाची अजून पूर्तता झालेली नाही.

आयोगाने केलेल्या शिफारसीवरून पाठिंबा अथवा विरोध करण्याचा निर्णय बैठकीत घेतला जाणार आहे. त्यासह आरक्षणासंदर्भात शासनाची चाललेल्या चालढकल विरोधात पुन्हा एकदा सरकारला तत्परतेने निर्णयास भाग पाडणे. मराठा समाजाच्या हितासाठी निर्णय घेण्यासाठी उद्युक्त करणे, आदींबाबत चर्चा केली जाणार आहे.

या बैठकीस सुमारे एक हजार समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. विनोद साळोखे म्हणाले, जानेवारीमध्ये आरक्षण जाहीर होईल, असे सरकारमधील एका जबाबदार मंत्र्यांनी सांगितले आहे. आरक्षण जाहीर करण्यास विलंब झाल्यास लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास मराठा समाजाची अडचण होणार आहे; त्यामुळे याअनुषंगाने पुढील दिशा ठरविण्यासाठी, खुल्या पद्धतीने चर्चा करण्यासाठी, वैचारिक बैठक आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेस हृषिकेश पाटील, सचिन दामुगडे, अनिकेत पाटील, योगेश पवार, विजय पाटील, अमोल गायकवाड, आदी उपस्थित होते.

फलकाद्वारे सरकारचा निषेधअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेतील चुकीचे निकष दूर करणे. आरक्षणासह विविध मागण्यांसाठीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाजातील युवकांवरील गुन्हे मागे घेणे, आदींबाबत सरकारकडून चालढकल सुरू आहे. त्याचा निषेध व्यंगचित्रे असलेले डिजिटल फलक दसरा चौकात लावून केला जाणार आहे, असे विनोद साळोखे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :marathaमराठाkolhapurकोल्हापूर