शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कोल्हापूर : विमानतळाबाबत नेत्यांनी थट्टा न थांबविल्यास हिसका दाखवू, शिवेसेनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 5:25 PM

विमानतळप्रश्नी सर्व लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरकरांची थट्टा थांबवावी, अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा शनिवारी शिवसेनेतर्फे देण्यात आला. हा प्रश्न सुटत नाही म्हणजे ही जागाच बाधित आहे काय? असा सवाल करत विमानतळावर उपहासात्मक होमहवन आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देविमानतळाबाबत नेत्यांनी थट्टा न थांबविल्यास हिसका दाखवू, शिवेसेनेचा इशारा विमानतळावर केले होमहवन आंदोलन

कोल्हापूर : विमानतळप्रश्नी सर्व लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरकरांची थट्टा थांबवावी, अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा शनिवारी शिवसेनेतर्फे देण्यात आला. हा प्रश्न सुटत नाही म्हणजे ही जागाच बाधित आहे काय? असा सवाल करत विमानतळावर उपहासात्मक होमहवन आंदोलन करण्यात आले.जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते सकाळी अकराच्या सुमारास उजळाईवाडी येथील विमानतळावर दाखल झाले. या ठिकाणी विमानतळाबाबत नुसते अभिनंदनपर फलक लावून प्रसिद्धी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना या प्रश्नात यश येत नसेल तर ही जागाच बाधित आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो, असा सवाल उपस्थित करत पक्षातर्फे या ठिकाणी उपहासात्मक होमहवन आंदोलनाला सुरुवात केली.

भटजींचे मंत्रोच्चार व मांत्रिकाच्या वेशभूषेतील कार्यकर्त्याने या आंदोलनात सहभाग घेऊन लोकप्रतिनिधींना सुबुद्धी द्यावी, अशी मागणी केली. हे अनोखे आंदोलन चर्चेचा विषय ठरले.विमानतळासह थेट पाईपलाईन, शाहू जन्मस्थळ, शिवाजी पूल अशा प्रश्नांमध्ये फक्त अभिनंदनपर फलक न लावता ते सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. यासाठी गटतट व श्रेयवाद बाजूला ठेवावा. तसेच या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरकरांची चालविलेली थट्टा थांबवावी, अन्यथा हिसका दाखवू, असा इशारा पवार व देवणे यांनी दिला.आंदोलनात शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, रवि चौगुले, सुजित चव्हाण, आप्पा पुणेकर, अवधूत साळोखे, राजू यादव, पप्पू नाईक, अभिजित बुकशेठ, आदी सहभागी झाले होते.

 

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर