कोल्हापूर : एखाद्या व्यक्तीला चक्कर आल्यानंतर आजही अनेक ठिकाणी आपण पारंपरिक उपचार करीत बसतो; परिणामी त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. अशा वेळी प्रथमोपचार काय करावेत, यासाठी भारतीय भूलशास्त्र संघटना, शाखा कोल्हापूरच्या वतीने मंगळवारी (दि. २३) कोल्हापूर शहरातील दहा ठिकाणी प्रशिक्षण केंदे्र घेणार असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षा डॉ. अंजली कद्दू व सचिव डॉ. विनोद भचरानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. अंजली कद्दू म्हणाल्या, आजच्या धगधगीच्या युगात हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. प्रगत देशात एक लाख लोकसंख्येत १५६ लोकांचे हृदयविकाराने निधन होते. हे प्रमाण भारतात साडेचार हजार आहे. हे चिंताजनक असून साक्षरतेचा अभाव, उपचारांची कमतरता, प्रथमोपचार करण्याची उदासीनता अशी अनेक कारणे आहेत.
याबाबतची जागृती करण्याचा निर्णय भारतीय भूलशास्त्र संघटनेने घेतला. त्यानुसार मंगळवारी शहरातील दहा ठिकाणी प्रथमोपचार कसे करावेत, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कद्दू यांनी सांगितले. यावेळी डॉ. किरण भिंगार्डे, डॉ. अरुणा चौगुले, डॉ. शीतल देसाई उपस्थित होते.
या ठिकाणी दिले जाणारे प्रशिक्षणसकाळी ७ ते ७.३० - शिवाजी विद्यापीठ योगासन वर्गसकाळी ७ ते ८ - ए. बी. एस. जिम सयाजी हॉटेलसकाळी ८ ते ९ - शांतिनिकेतन विद्यालयसकाळी १०.३० ते दुपारी एक - स. म. लोहिया महाविद्यालयसकाळी १० ते ११.३० - सीपीआरदुपारी १२ ते २ - न्यू हायस्कूल, पेटाळासायंकाळी ४ ते ५.३० - डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडीदुपारी ३ ते ५ - संस्कार शाळा, कदमवाडीसायंकाळी ४ ते ५ - अस्टर आधार हॉस्पिटल व अलंकार हॉल, पोलीस मैदानसायंकाळी ७ ते ८ - गोल्ड जिम, कोल्हापूर.