शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

कोल्हापूर : विभागीय क्रीडासंकुलाला आयआयटी तज्ज्ञांनी दिली भेट, आठ दिवसांत अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 6:13 PM

गेल्या नऊ वर्षांपासून विभागीय क्रीडासंकुलातील रखडलेल्या बहुचर्चित जलतरण तलाव व डायव्हिंग तलावाची आयआयटीचे प्रा. महमद सलमान यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शनिवारी पाहणी केली. नमुने व बांधकाम ठेकेदाराबरोबर चर्चा केली. या पाहणीचा अहवाल येत्या आठ दिवसांत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिला जाणार आहे. त्यानंतर तलावाची दुरुस्ती की अन्यत्र बांधणी याबाबत निर्णय होणार आहे.

ठळक मुद्देविभागीय क्रीडासंकुलाला आयआयटी तज्ज्ञांनी दिली भेट, क्रीडासंकुलातील जलतरण तलावाच्या तपासणीला मुहूर्त लागला

कोल्हापूर : गेल्या नऊ वर्षांपासून विभागीय क्रीडासंकुलातील रखडलेल्या बहुचर्चित जलतरण तलाव व डायव्हिंग तलावाची आयआयटीचे प्रा. महमद सलमान यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शनिवारी पाहणी केली. नमुने व बांधकाम ठेकेदाराबरोबर चर्चा केली. या पाहणीचा अहवाल येत्या आठ दिवसांत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिला जाणार आहे. त्यानंतर तलावाची दुरुस्ती की अन्यत्र बांधणी याबाबत निर्णय होणार आहे.संभाजीनगर येथील विभागीय क्रीडासंकुलातील बहुचर्चित जलतरण तलाव व डायव्हिंग तलावात त्या परिसरातील सांडपाणी मिसळते. त्यामुळे जलतरण तलाव तयार होऊन हा तलाव पोहण्यासाठी खुला केला नव्हता. त्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांत विविध उपाय सुचविण्यात आले. त्यावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे अखेर संकुल समितीतर्फे विभागीय आयुक्तांनी आयआयटीच्या तज्ज्ञांमार्फत जलतरण तलाव व डायव्हिंग तलावाची तपासणी करून घेण्याचा निर्णय घेतला.

कोल्हापुरातील संभाजीनगर येथील विभागीय क्रीडासंकुलातील जलतरण तलावातील बांधकामाचे शनिवारी आयआयटीच्या तज्ज्ञांनी नमुने घेतले.

यात पावसाळा आल्याने त्याची पाहणी दोन वेळा रखडली. मात्र, शनिवारी या पाहणीसाठी अखेर मुहूर्त मिळाला. त्यानुसार प्रा. सलमान यांच्यासह तीन अन्य अभ्यासकांनी तलावाची पाहणी केली. तलावातील बांधकामाचे नमुनेही घेतले. यासह बांधकाम ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशीही सविस्तर चर्चा केली.बांधकामाबाबतचा आराखडा, छायाचित्रे, आदी माहिती घेतली. आता यावर येत्या आठ दिवसांत अहवाल तयार केला जाणार आहे. हा अहवाल तयार झाल्यानंतर प्रा. सलमान हे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना येत्या आठ दिवसांत सादर करणार आहेत.

यावेळी क्रीडा उपसंचालक कार्यालयाचे क्रीडाधिकारी बाजीराव देसाई व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता एस. एस. कुंभार यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संकुल समितीतर्फे दुरुस्ती की अन्यत्र बांधकाम याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर