कोल्हापूर : लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा बाल नाटय स्पर्धांची खऱ्या अर्थाने गरज आहे. या स्पर्धेत बाल मित्रांनी मोठया संख्येने सहभागी होऊन कलेचा आनंद घ्यावा, असे आवाहन महापौर सरिता मोरे यांनी शुक्रवारी येथे केले . केशवराव भोसले नाट्यगृहात शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे १६ व्या बाल राज्य नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी महापौर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने स्पर्धेेचे उद्घाटन झाले. ११ जानेवारीपर्यंत या स्पर्धा सुरु राहणार आहेत.गेल्या २५ वषार्पासून बालरंगभूमीची सेवा करणाऱ्या सलीम शेख आणि तरन्नुम शेख या दांपत्याचा महापौर मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी अखिल भारतीय नाटय परिषद कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मनोहर कुईगडे प्रमुख उपस्थित होते.सलीम शेख म्हणाले, आतापर्यंत अनेकवेळा माझे सत्कार झाले, परंतु शासनाने आमच्या कामाची दखल घेऊन केलेल्या सन्मानामुळे समाधान वाटत आहे. प्रशांत जोशी यांनी स्वागत केले . यावेळी मिलिंद अष्टेकर, परीक्षक प्रकाश देवा (नागपूर ), दिलीप भताडे (रत्नागिरी), निता कुलकणी (बेळगाव) आदी उपस्थित होते .
बाल कलाकारांच्या अविष्काराने रसिक तृप्तआजच्या सर्धेची सुरुवात एस. पी शिसोदे लिखित 'पाऊल पडते पुढे' या नाटकाने झाली . आदर्श गुरुकुल विद्यालय हातकणंगलेच्या कलाकारांनी हे नाटक सादर केले . यानंतर व्ही . ए . पोतदार आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ' तप्त दाही दिशा ' हे नाटक सादर केले तर आण्णाभाऊ इंग्लिश स्कूल आजरा येथील विद्यार्थ्यांनी ' एक घर एकविसाव्या शतकातील ' नाटक सादर करुन रसिकांना तृप्त केले. बाल कलाकारांच्या अविष्काराला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
उद्याचे नाटकसकाळी ९ वाजतानाटक : भेटलेखक : असिफ अन्सारीदिग्दर्शक : ऋषिकेश डोंगरेसादरकर्ते : आम्ही कलाकार सांस्कृतिक प्रतिष्ठान (इचलकरंजी)
सकाळी १०.१५वाजतानाटक : केल्याने होत आहे रेलेखक : ज्योतीराम कदमदिग्दर्शक : संजीव चौगुलेसादरकर्ते : डॉ. बापट बाल शिक्षण मंदीर(सांगली)
सकाळी ११.३० वाजतानाटक : सावधान पर्यावरण संपत चालले होलेखक : ए.एन. इंगवलेदिग्दर्शक : ए.एन. इंगवलेसादरकर्ते : ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल (पेठ वडगाव)