- अतुल आंबीइचलकरंजी - आगामी लोकसभा निवडणूक ठोकशाही विरुद्ध लोकशाही या मुद्द्यावर होईल. महागाई, बेरोजगारी, उद्योजक, शेतकऱ्यांचे प्रश्न, यामुळे जनता त्रस्त आहे. भ्रष्ट मोदी सरकारला पायउतार करण्यासाठी 2024 ची निवडणूक महत्वाची आहे. म्हणून भाजप विरोधात इंडिया आघाडी एकास एक उमेदवार देऊन मताची विभागणी टाळणार आहे. त्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरु असून त्याला नक्की यश मिळेल, असा विश्वास काँग्रेस चे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना व्यक्त केला.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी, शिरोळ आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचा आढावा चव्हाण यांनी शनिवारी काँग्रेस समिती मध्ये घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला. ते म्हणाले राज्यात इडी, सिबीआय या माध्यमातून ऑपरेशन कमळ राबवून ठोकशाहीच्या माध्यमातून दबावाचे राजकारण तसेच मंत्री पदाचे आमिष दाखवले जात आहे. यातून चाललेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. आता विचारांचे वारे निर्माण होत आहे. पेट्रोल डिझेल गॅसवर कर लावून हे सरकार देश चालवत आहे. देशाच्या मालमत्ता विकत आहेत. अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे आता लोकांनी भ्रष्ट मोदी सरकारची हकालपट्टी करायचं ठरवलं आहे. यावेळी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, पी एन पाटील, प्रदेश सचिव शशांक बावस्कर, राहुल खंजीरे, संजय कांबळे, मीना बेडगे, आदींचा काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पाणी सर्वांना मिळायला पाहिजेशहराच्या पाणी प्रश्नावर चव्हाण म्हणाले, पाणी सर्वांनाच मिळायला पाहिजे. त्यासाठी आपल्या शहराच्या योजनेसंदर्भात जिल्ह्यातील नेते एकत्र बसून नक्कीच तोडगा काढतील.
बीआरएस पार्टी भाजपची बी टीमबीआरएस पार्टी भाजपची बी टीम असून त्यांना सर्व रसद भाजपकडून पुरवली जात असल्याचा घणाघात चव्हाण यांनी केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आटापिटा सुरु असताना काँग्रेसने त्यांना त्यांच्याच राज्यात रोखून धरले आहे. असेही त्यांनी सांगितले.
चव्हाण यांच्याकडे 2 मतदार संघाची जबाबदारीकाँग्रेसकडून 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी 24 जणांची टीम महाराष्ट्र राज्यात पाठवण्यात आली आहे. आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. आता केवळ आम्ही मित्रपक्ष, विरोधात कोण आहे, आमची ताकद किती आहे याचा आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेट्टी कधीही भाजप सोबत जाणार नाहीतमाजी खासदार राजू शेट्टी हे कधीही भाजप सोबत जाणार नाहीत असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. शेट्टी यांनी जातीवादी पक्षांना विरोध केला असल्याचे सांगून त्यांच्यासोबत महाविकास आघाडीची चर्चा चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.
कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जाईलकर्नाटक पॅटर्न काँग्रेसने महाराष्ट्रात राबवला आहे. तिन्ही पक्ष एकत्रपणे भाजपला विरोध करणार आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटल्यानंतर मतदारसंघातील भावना पाहता पक्ष फुटला असला तरी जनता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने आहे. निवडणूकित ते दिसेल.