कोल्हापूर : कोल्हापूरचे सहायक वनसंरक्षक विजय गोसावी व पेंडाखळेचे वनक्षेत्रपाल ए. बी. जेरे. यांच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाने शनिवारी केली. याबाबतचे निवेदन कार्यालय अधीक्षक सुधीर सोनवणे यांना ताराबाई पार्क येथील वनविभागाच्या कार्यालयात दिले.गोसावी यांनी पन्हाळा, करवीर, मलकापूर, पेंडाखळे, गगनबावडा या पाच वनक्षेत्रांतील लाकूड व्यापाऱ्यांना धाक दाखविणे, शासकीय वाहनांचा गैरवापर, अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या कारवायांमध्ये आर्थिक तडजोड केली आहे.तसेच जेरे यांनी वनक्षेत्रात एका कंपनीची केबल घालण्यास सहकार्य केले. ते नियमाप्रमाणे मुख्यालयात राहत नाहीत. त्यामुळे कामे प्रलंबित आहेत, असे निवदेनात म्हटले आहे. पन्हाळा-शाहूवाडी संघटक प्रमुख मारुती ज्ञा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. योगेश मराठे, किसन पाटील, किसन मोरे, पांडुरंग पाटील, चंद्रकांत कांबळे, महिपती खोत आदी उपस्थित होते.