शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

कोल्हापूर : तीन लाख अपात्र खात्यांची फेरतपासणी : कोल्हापूर विभागातील कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:34 AM

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अपात्र ठरलेल्या राज्यातील २८ लाख खात्यांची फेरतपासणी सुरू झाली आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा या

ठळक मुद्देकुटुंबाचा निकष बदलल्याने निर्णय; नवीन कर्जपुरवठ्याची शहानिशाखातेदारांच्या याद्या तालुकास्तरीय समितीकडे तपासणीसाठीअहवाल चार दिवसांत आयुक्तांना द्यायचा

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अपात्र ठरलेल्या राज्यातील २८ लाख खात्यांची फेरतपासणी सुरू झाली आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील एकूण तीन लाख खातेदारांचा समावेश आहे.

कुटुंबातील एकाच व्यक्तीला कर्जमाफीचा लाभ, या निकषामुळे शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते; पण आता कुटुंबातील इतरांनाही लाभ देण्याचा निर्णय झाल्याने अपात्र खात्यांच्या फेरतपासणीचे आदेश दिले असून, कोल्हापूर विभागातील तीन लाख खात्यांची तपासणी तालुकास्तरीय समितीने सुरू केली आहे.

राज्य सरकारने जून २०१७ मध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत, दीड लाखावरील शेतकºयांना एकरकमी परतफेड योजना व नियमित परतफेड करणाºयांना प्रोत्साहनपर अनुदान अशी कर्जमाफीची योजना आणली. निकषानुसार एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ दिला. त्यामुळे कुटुंबातील इतर खातेदार लाभांपासून वंचित राहिले. आतापर्यंत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत चार लाख ६९ हजार ३४९ खातेदारांना ९४८ कोटींची कर्जमाफी मिळाली आहे; पण लाखो शेतकरी वेगवेगळ्या निकषांत आडकल्याने ते वंचित राहिले. सरकारने मध्यंतरी या निकषांत बदल करून कुटुंबातील सर्वच व्यक्तींना लाभ देण्याचा निर्णय घेतला.

कुटुंब निकष आणि इतर कारणांमुळे अपात्र ठरलेल्या राज्यातील २८ लाख खातेदारांचा डाटा पुन्हा जिल्हा व तालुकास्तरीय समितीकडे फेरतपासणीसाठी पाठविला आहे. कोल्हापूर विभागात तीन लाख १ हजार १६४ असे खातेदार आहेत. त्यामध्ये कोल्हापुरात सर्वाधिक एक लाख ३३ हजार २८२, सांगलीत ७६ हजार ८१९ तर साताºयात ९१ हजार ६३ खातेदारांचा समावेश आहे. या खातेदारांच्या याद्या तालुकास्तरीय समितीकडे तपासणीसाठी आल्या आहेत. त्यांची तपासणी करून पात्र खातेदारांची यादी १० आॅक्टोबरपर्यंत सरकारकडे सादर करायची आहे.

त्याशिवाय २०१६-१७ या आर्थिक वर्षातील ज्या खातेदारांना कर्जमाफीचा लाभ झाला, त्यांना पीक व मध्यम मुदतीचा कर्जपुरवठा बॅँकांनी केला का? याची तपासणी करण्याचे आदेश लेखापरीक्षकांना दिले आहेत. त्याचबरोबर शेतकरी पात्र झाले; पण त्यांना खरोखरच पैशांचा लाभ झाला का? याची शहानिशाही लेखापरीक्षक करणार आहेत. त्यासाठी विकास संस्थांसह शेतकºयांना अर्थपुरवठा करणाºया संस्थांसाठी १ ते ६६ कॉलमचा नमुना दिला आहे. त्यांनी पात्र झालेल्या खातेदारांची संपूर्ण माहिती भरायची, लेखापरीक्षक त्याची तपासणी करणार असून त्याचा अहवाल चार दिवसांत आयुक्तांना द्यायचा आहे.कोल्हापूर विभागामध्येआतापर्यंत झालेली कर्जमाफीजिल्हा पात्र खातेदारांची संख्या कर्जमाफीची रक्कमकोल्हापूर एक लाख ७० हजार ९०१ ३१४ कोटीसांगली एक लाख १४ हजार ५९१ २५९ कोटीसातारा एक लाख ८३ हजार ८५७ ३७४ कोटीएकूण ४ लाख ६९ हजार ३४९ ९४८ कोटी

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर