शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

कोल्हापूर : जलयुक्त शिवारमुळे जाखले, वाडीरत्नागिरी पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 2:09 PM

गावातील प्राचीन तलावांना कचरा कोंडाळ्याचे स्वरूप आले होते. आता हे सर्व चित्र बदलले असून, वाडीरत्नागिरीतील गावतलाव चकाचक झाले आहेत, तर जाखलेतील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पाणीटंचाईचे नावच या दोन गावातून गायब झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ठळक मुद्देजलयुक्त शिवारमुळे जाखले, वाडीरत्नागिरी पाणीदारपाणीटंचाईचे नावच दोन गावातून गायब

कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेतील प्रभावशाली कामांमुळे पन्हाळा तालुक्यातील वाडीरत्नागिरी व जाखले ही दोन गावे पाणीदार बनली आहेत. तीन वर्षांपूर्वी ही गावे पाणीटंचाईचा सामना करत होती. गावातील प्राचीन तलावांना कचरा कोंडाळ्याचे स्वरूप आले होते. आता हे सर्व चित्र बदलले असून, वाडीरत्नागिरीतील गावतलाव चकाचक झाले आहेत, तर जाखलेतील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पाणीटंचाईचे नावच या दोन गावातून गायब झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.जलयुक्त शिवार योजनेतील कामांचा आढावा घेण्यासाठी म्हणून सोमवारी शासनाच्या वतीने पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्यक्षात येथील कामांची पाहणी केली असता, कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्शवत असे काम जाखल्यात झाल्याचे दिसले.

कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. नंदकुमार कदम यांच्या नेतृत्वाखालील पाहणी दौऱ्यात उपविभागीय जलसंधारण अधिकारी धनाजी पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे कनिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. गोंधळी, जाखलेचे सरपंच सागर माने, जिल्हा माहिती अधिकारी एस. आर. माने यांच्या वृत्तपत्र प्रतिनिधींनी सहभाग घेतला.जोतिबा डोंगरावरील कर्पूरेश्वर तलावाचा कचरा कोंडाळा झाला होता. जलयुक्त शिवार योजनेतून ३४ लाख रुपये खर्चून या तलावातील गाळ काढून त्याची डागडुजीही केली. आज या तलावाचे सुंदर जलाशयात रुपांतरण झाले आहे. तेथे ८ टीसीएम पाणीसाठा आहे.

डोंगरावरच यमाई या प्राचीन तलावातही या योजनेतून काम हाती घेण्यात आले, तथापि काही काम अजून अपूर्ण असल्याने या तलावाला मात्र अवकळा आली आहे. तेथील जवळच असलेल्या टेकडीवर समतल चरीचे काम झाले असून, यातून डोंगर उतारावरून वाहणारे पाणी अडवण्याचा प्रयोग राबविण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी केलेल्या या कामांमुळे आजूबाजूच्या विहिरीतील पाणीसाठा वाढला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जाखले या गावात तर, गावाने ठरवले तर काय घडू शकते? याची तलावातील पाणीसाठा पाहून प्रचिती येते. जेथे दरवर्षी दीड हजार मिलिमीटर पाऊस पडतो, पण उन्हाळ्यात पिकासाठी व पाण्यासाठी पाण्याची शोधाशोध करावी लागते, त्या जाखले गावात गावकऱ्यांनी एकत्र येऊन तब्बल ४८ दिवस सलग श्रमदान करून राळेगणसिद्धी व हिवरेबाजारचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गाव जलयुक्त घडवण्याची किमया साधली आहे.गाव आणि आजूबाजूच्या परिसरात डोंगरमाथ्यावरून वाहणारे पाणी पायथ्याला अडवून त्यावर वर्षभर जलसमृद्धी आणि त्यातून गावची समृद्धी साधता येते, हे गावकऱ्यांनी दाखवून दिले आहे. पाणी अडवून ते जिरवण्याबरोबरच आहे ते पाणी काटकसरीने वापरण्याबाबतही गावकरी आग्रही आहेत; त्यामुळे जमिनीत पाणी मुरवण्यासाठी तयार केलेल्या तलाव व ओढ्यांवर उपसाबंदी आहे.

गावात बोअर मारता येत नाही. शिवाय घरगुती वापरातून निर्माण होणारे सांडपाणी शोषखड्ड्याद्वारे जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; त्यामुळे गावात तुंबलेल्या पाण्याचे डबके सहसा दृष्टीस पडत नाही. जमिनीच्या पोटात अधिकाधिक पाणी साठवून ते गरजेइतकेच वापरण्याबाबत ग्रामस्थ कमालीचे आग्रही आहेत, त्यांना गावचे सरपंच सागर माने यांची पाण्याविषयीची धडपडही कारणीभूत आहे.

गावकऱ्यांनी एकदिलाने जलयुक्त शिवार अभियान शासनयोजना आणि लोकसहभागातून गतिमान करून पाझर तलावाचे पुनर्जीवन केले, ओढ्यांवर जागोजागी साखळी सिमेंट बंधारे घेतले, डोंगर उतारावरील ओघळ जोडणी प्रकल्प, सीसीटी, वनतळी घेतल्यामुळे आज जाखलेच्या शिवारात पाणी खेळू लागले आहे.गाळामुळे उत्पन्न तिप्पटीने वाढलेगावातील पाझर तलाव, ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनयोजना आणि लोकसहभागातून राबविण्यात आले. जवळपास ११ हजार ५00 ट्रॉली गाळ लोकसहभागातून काढून शेतात टाकण्यात आला; त्यामुळे ओढ्यामध्ये चांगला पाणीसाठा निर्माण होण्याबरोबरच चांगल्या दर्जाची माती शेतीस मिळाल्याने पिकांचे उत्पन्न तिप्पटीने वाढले आहे. 

 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारkolhapurकोल्हापूर