कोल्हापूर : महापालिकेने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी अशा सुमारे २५०० जणांनी जयंती नदी स्वच्छता मोहिमेत रविवारी सहभाग घेतला. पात्र व काठावरील कचरा, प्लास्टिक, खुरट्या वनस्पती काढून पाणी प्रवाहित केल्याने नदीने मोकळा श्वास घेतला.या मोहिमेत ७० टन कचरा जमा झाला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे एकेकाळी अरुंद असलेल्या जयंती नदीचे मोठ्या नाल्यात रुपांतर झाले आहे. शहरातील सांडपाणी याच नाल्याद्वारे प्रक्रिया होऊन जाते. पावसाळ्यापूर्वी यंदा कोल्हापूर महापालिकेमार्फत लोकसहभागातून नालेसफाई म्हणजेच नाल्याला नदीचे पूर्ववत स्वरूप प्राप्त करून देण्याची संकल्पना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी यशस्वीपणे राबविली.लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविली. त्यातून नागरिकांना घरगुती ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे जमा करण्याची सवय लागावी, हाच उद्देश आहे. ५ जेसीबी, ४ पोकलॅन, १० डंपरद्वारे एकूण ७० टन कचरा काढला.- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, कोल्हापूर मनपा
कोल्हापुरात जयंती नदीने घेतला मोकळा श्वास, लोकसहभागातून सफाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 3:32 AM