कोल्हापूर : आबालवृद्धांनी लुटला गणेशदर्शनाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 11:44 AM2018-09-17T11:44:26+5:302018-09-17T11:51:11+5:30

गणेशोत्सवातील पहिलाच रविवार सुटीचा मिळाल्याने अनेक गणेशभक्तांनी केवळ आकर्षक गणेशमूर्ती पाहण्याचा आनंद लुटला. त्यामुळे सायंकाळनंतर राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी चौक येथे गणेशभक्तांनी गर्दी केली होती.

Kolhapur: The joy of Ganesh Darshan looted by the Aborigines | कोल्हापूर : आबालवृद्धांनी लुटला गणेशदर्शनाचा आनंद

कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकातील महागणपतीच्या दर्शनाला रविवारी सायंकाळी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. (छाया : दीपक जाधव)

googlenewsNext
ठळक मुद्देदेखाव्यांच्या अगोदर आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यास भक्तांची पसंती राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी चौकात गर्दी

कोल्हापूर : गणेशोत्सवातील पहिलाच रविवार सुटीचा मिळाल्याने अनेक गणेशभक्तांनी केवळ आकर्षक गणेशमूर्ती पाहण्याचा आनंद लुटला. त्यामुळे सायंकाळनंतर राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी चौक येथे गणेशभक्तांनी गर्दी केली होती.

गणेशोत्सवात घरगुती गणेशमूर्ती व गौरी विसर्जनानंतर सार्वजनिक मंडळांचे देखावे सर्वांसाठी खुले केले जातात. यंदा देखावे मंगळवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यात गणेशोत्सव काळातील पहिलाच रविवार सुटीचा मिळाल्याने अनेक कुटुंबांनी केवळ आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यास पसंती दिली. 

कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकातील महागणपतीच्या दर्शनाला रविवारी सायंकाळी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. (छाया : दीपक जाधव)

त्यामुळे सायंकाळनंतर राजारामपुरीतील दुसरी गल्ली येथील शिवाजी तरुण मंडळाचे काल्पनिक आकर्षक मंदिर, तर शाहूपुरी येथील राधाकृष्ण तरुण मंडळाने साकारलेली जॉर्डन येथील पेट्रा जॉर्डन ही गुहा पाहण्यासाठी काही प्रमाणात गर्दी केली होती.

यासह शिवाजी चौकातील महागणपती व छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळाची २१ फुटी गणेशमूर्ती पाहण्यासाठी सायंकाळनंतर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यासह शहरातील मंगळवार पेठेतील जय पद्मावती तरुण मंडळाची ‘वज्रवैभव’ तिबेटीयन मूर्ती, टेंबे रोडवरील जादू ग्रुप, मॉडर्न स्पोर्टसची आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यास पहिली पसंती दिली.

मंगळवारनंतर शहरातील शिवाजी पेठ परिसरातील दयावान गु्रपची कमान, बुवा चौकातील मित्रप्रेम तरुण मंडळ, रंकाळा टॉवर मित्रमंडळ (सजीव देखावे), मंगळवार पेठेतील अनेक मंडळांचेही सजीव देखावे, तर शिवाजी उद्यमनगर परिसरातील मदनलाल धिंग्रा तरुण मंडळचा ‘सिंच्यान’, जय शिवराय तरुण मंडळाचे ३० फुटी अवकाशयान व स्पेस सेंटर असे तांत्रिक देखावेही उद्या, मंगळवार अथवा बुधवारी पाहण्यास खुले होतील.

 

 

Web Title: Kolhapur: The joy of Ganesh Darshan looted by the Aborigines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.