शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

कोल्हापूर : निवडणूक वादातून केर्लेत हाणामारी, दोन्ही बाजूंचे चौघे जखमी : परस्परविरोधी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 11:05 AM

केर्ले (ता. करवीर) येथे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या वादातून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. काठ्या व लोखंडी गजांनी केलेल्या मारहाणीत दोन्ही बाजूंचे चौघे जखमी झाले.

ठळक मुद्देनिवडणूक वादातून केर्लेत हाणामारीदोन्ही बाजूंचे चौघे जखमी परस्परविरोधी गुन्हे

कोल्हापूर : केर्ले (ता. करवीर) येथे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या वादातून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. काठ्या व लोखंडी गजांनी केलेल्या मारहाणीत दोन्ही बाजूंचे चौघे जखमी झाले.

सचिता सर्जेराव पाटील (वय ४५), त्यांचे पती सर्जेराव रामचंद्र पाटील (५०), शुभांगी प्रसाद पाटील (२६), प्रसाद दत्तात्रय पाटील (३२) अशी जखमींची नावे आहेत. या चौघांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी (दि. १) दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी करवीर पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले.अधिक माहिती अशी, केर्ले ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये कृष्णात पाटील हे विजयी झाले. यावेळी विजयी मिरवणुकीमध्ये संशयित प्रसाद पाटील याने सचिता पाटील यांच्या घरात सुतळी फटाका पेटवून टाकला. त्याचा जाब विचारण्यासाठी सचिता व त्यांचे पती सर्जेराव पाटील गेले असता दोन्ही कुटुंबांत जोरदार हाणामारी झाली.

काठ्या, लोखंडी गजांचा वापर झाल्याने चौघेजण जखमी झाले. या प्रकरणी करवीर पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्याने पोलिसांनी संशयित चौघा जखमींसह कमल रामचंद्र पाटील (५०), स्वप्निल सर्जेराव पाटील (२८), सुभाष सर्जेराव पाटील (४८) यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक दिलीप जाधव अधिक तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा