कोल्हापूर : ऊसदरावरून निर्माण झालेली कोंडी शनिवारी अखेर फुटली. स्वाभिमानी शेतकरी संघटना व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार यांच्यातील बैठकीत एकरकमी एफआरपीवर तडजोड झाली. तसेच पैसे उपलब्ध होतील तसे गत हंगामातील दोनशे रुपये द्यायचे व भविष्यात साखरेचे दर चांगल्या पद्धतीने वाढले तर संघटनेच्या मागणीनुसार यावर्षीच्या उसाला उर्वरित दोनशे रुपये द्यायचे, यावर कारखानदार व संघटनेमध्ये एकमत झाले.आज, रविवारपासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला. स्वाभिमानी शेतकरी
संघटनेने जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत ‘एफआरपी’ अधिक दोनशे रुपयांची मागणी करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते; पण साखरेचा बाजारातील दर, बॅँकांकडून मिळणारी उचल आणि एफआरपी यांचा ताळमेळ बसत नसल्याने एकरकमी एफआरपी देणेच शक्य नसल्याची भूमिका कारखानदारांनी घेतली होती. त्यामुळे गेले पंधरा ते वीस दिवस ऊसदराची कोंडी निर्माण झाली होती. याबाबत साखर कारखानदारांच्या दोन-तीन बैठक झाल्या, सरकारने मदत करण्याची भूमिका घेतली; पण ठोस निर्णय होत नव्हता.
शनिवारी सकाळी जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक होऊन ‘स्वाभिमानी’बरोबर चर्चा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार माजी मंत्री प्रकाश आवाडे, सतेज पाटील, संजय मंडलिक, गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, पी. जी. मेढे व ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, अनिल मादनाईक यांची शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यामध्ये ‘स्वाभिमानी’ एफआरपी अधिक दोनशे रुपयांवर ठाम राहिली, तर एकरकमी एफआरपी देता येत नसल्याचे कारखानदारांनी सांगितले. ‘एफआरपी’ देणे कायद्याने बंधनकारक आहे,
त्यानुसार ७०:३० फॉर्मुल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. आता पैसे उपलब्ध नसल्याने एकरकमी एकआरपी देता येत नसल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. यावर हरकत घेत एफआरपीचे तुकडे खपवून घेणार नसल्याचे मादनाईक यांनी सांगितले. यावर तब्बल पाऊण तास संघटना नेते व कारखानदारांच्यात घमासान चर्चा झाली. काटे व प्रकाश आवाडे यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याशी फोनवरून चर्चा करून भूमिका सांगितली. अखेर एकरकमी एफआरपी द्यायची, मागील दोनशे रुपयांमधील उर्वरित रक्कम उपलब्धतेनुसार द्यायचे आणि भविष्यात साखरेचे दर चांगल्या प्रकारे वाढले तर या हंगामातील दोनशे रुपये देण्यास शेट्टी यांनी अनुमती दिल्याने कोंडी फुटली.ऊस पळविणाºयांचे कारखाने बंद कराशासकीय विश्रामगृहातील बैठकीत प्रकाश आवाडे आक्रमक झाले होते. ‘राजारामबापू’ कारखान्याने कोल्हापुरातील ७० हजार टन ऊस उचलला, आमचे कारखाने आठ दिवस बंद राहिले, आता त्यांचे कारखाने बंद ठेवा, असे आवाडे यांनी भगवान काटे यांना सांगितले.शेट्टींच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच तोडगाराजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ऊसदराची कोंडी फोडून तोडगा काढला जायचा; पण यंदा चर्चेची सारी मदार भगवान काटे व अनिल मादनाईक यांच्यावर होती. शेट्टींच्या अनुपस्थितीत १७ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच तोडगा निघाला. शेट्टी ऊस आंदोलन श्रेयासाठी करतात, असे म्हणणाºयांची तोंडे बंद केल्याचा टोला मादनाईक व राजेंद्र गड्यान्नावर यांनी पत्रकारांशी बोलताना हाणला.पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला‘स्वाभिमानी’च्या आजच्या चक्काजाम आंदोलनाची धास्ती साखर कारखानदारांबरोबरच पोलीस यंत्रणेने घेतली होती. त्यामुळे शनिवारच्या बैठकीकडे शेतकºयांसह पोलीस खात्याच्या नजरा होत्या. बैठकीतील प्रत्येक हालचालीची माहिती पोलीस घेत होते. तीन वाजता ऊसदराची कोंडी फुटली आणि पोलिसांच्या चेहºयावरील ताण कमी झाला.समजूतदारपणाबद्दल राजू शेट्टी यांचे अभिनंदन : चंद्रकांत पाटीलऊस आंदोलनात कुठे थांबायचे, हे खासदार राजू शेट्टी यांना चांगले कळते. त्यानुसार त्यांनी यंदाच्या हंगामात एकरकमी ‘एफआरपी’चा तोडगा मान्य करून समजूतदारपणा दाखविल्याबद्दल सरकारच्या वतीने त्यांचे अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. ऊसदराची कोंडी फुटल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असून, निघालेल्या तोडग्याचे स्वागत केले आहे.कारखान्यांतील साखरेची आता नाकाबंदी : रघुनाथ पाटीलएकरकमी एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. कारखानदारांनी कायदा पाळला, त्यामध्ये राजू शेट्टींच्या चळवळीचे यश काय? असा सवाल करत शेतकºयांना मागील हंगामातील उर्वरित दोनशे रुपये दिल्याशिवाय आम्ही हंगाम सुरू होऊ देणार नाही. आज, रविवारपासून ऊसदराचे आंदोलन अधिक तीव्र करणार असून, आता कारखान्यांतून साखर बाहेर पडू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
ऊस पळविणाºयांचे कारखाने बंद कराशासकीय विश्रामगृहातील बैठकीत प्रकाश आवाडे आक्रमक झाले होते. ‘राजारामबापू’ कारखान्याने कोल्हापुरातील ७० हजार टन ऊस उचलला, आमचे कारखाने आठ दिवस बंद राहिले, आता त्यांचे कारखाने बंद ठेवा, असे आवाडे यांनी भगवान काटे यांना सांगितले.शेट्टींच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच तोडगाराजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ऊसदराची कोंडी फोडून तोडगा काढला जायचा; पण यंदा चर्चेची सारी मदार भगवान काटे व अनिल मादनाईक यांच्यावर होती. शेट्टींच्या अनुपस्थितीत १७ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच तोडगा निघाला. शेट्टी ऊस आंदोलन श्रेयासाठी करतात, असे म्हणणाºयांची तोंडे बंद केल्याचा टोला मादनाईक व राजेंद्र गड्यान्नावर यांनी पत्रकारांशी बोलताना हाणला.पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला‘स्वाभिमानी’च्या आजच्या चक्काजाम आंदोलनाची धास्ती साखर कारखानदारांबरोबरच पोलीस यंत्रणेने घेतली होती. त्यामुळे शनिवारच्या बैठकीकडे शेतकºयांसह पोलीस खात्याच्या नजरा होत्या. बैठकीतील प्रत्येक हालचालीची माहिती पोलीस घेत होते. तीन वाजता ऊसदराची कोंडी फुटली आणि पोलिसांच्या चेहºयावरील ताण कमी झाला.पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठककारखानदार व ‘स्वाभिमानी’ यांच्यात झालेल्या तोडग्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कारखानदारांनी सांगितली. ‘एफआरपी’साठी सरकारकडून मदतीबाबत पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिल्याची माहिती प्रकाश आवाडे यांनी दिली.उर्वरित जिल्ह्यांत आता ‘भडका’कोल्हापुरातील आंदोलन मागे घेतले असले तरी आज, रविवारपासून उर्वरित जिल्ह्यांत आंदोलनाचा भडका उडविणार आहे, असे भगवान काटे म्हणाले.सांगलीतही ‘कोल्हापूर पॅटर्न’ मान्यऊसदराचा कोल्हापुरात निघालेला तोडगा सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनीहीमान्य केला आहे. कारखानदार व संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज, रविवारी पुकारलेले बंद आंदोलन सांगली जिल्ह्यात शनिवारी रात्री मागे घेतले.
समजूतदार भूमिका घ्याकोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी जशी समजूतदाराची भूमिका घेतली, तशी इतर जिल्ह्यांतील कारखानदारांनी घ्यावी, सरकारने बघ्याची भूमिका घेणे बंद करून मदतीसाठी पुढे आले पाहिजे.- राजू शेट्टी, खासदार
एकरकमी एफआरपी, मागील हंगामातील उर्वरित दोनशे पैकी देय रक्कम उपलब्धतेनुसार द्यायची. भविष्यात साखरेचे दर वाढणार असे संघटनेला वाटते. तसे झाले तर पुन्हा बैठक घेऊन यावर्षीच्या दोनशे रुपयांबाबत निर्णय घेतला जाईल.- प्रकाश आवाडे, अध्यक्ष, जवाहर-हुपरी.
एफआरपीच देता येत नाही, असे कारखानदार म्हणत होते; पण ‘स्वाभिमानी’च्या धसक्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्याबद्दल कारखानदारांचे अभिनंदन करतो. पण त्यांनी दिलेला शब्द फिरवला तर ‘स्वाभिमानी’चा इंगा दाखवला जाईल,- भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, ‘स्वाभिमानी’