शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

कोल्हापूर : केएसए वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा : ‘प्रॅक्टिस’चा ‘बालगोपाल’वर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 2:37 PM

केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी अटीतटीच्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने (अ) बालगोपाल तालीम मंडळावर ४-३ अशा गोलने निसटता विजय मिळविला. पाटाकडील तालीम मंडळ (पीटीएम ‘ब’) आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यातील सामना १-१ अशा गोलने बरोबरीत सुटला.

ठळक मुद्देकेएसए वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा : ‘प्रॅक्टिस’चा ‘बालगोपाल’वर विजय‘पीटीएम’- ‘उत्तरेश्वर प्रासादिक’ बरोबरीत

कोल्हापूर : केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी अटीतटीच्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने (अ) बालगोपाल तालीम मंडळावर ४-३ अशा गोलने निसटता विजय मिळविला. पाटाकडील तालीम मंडळ (पीटीएम ‘ब’) आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यातील सामना १-१ अशा गोलने बरोबरीत सुटला.कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा येथील छत्रपती शाहू स्टेडियम येथे होत आहे. प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (‘अ’) आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सायंकाळचा सामना अत्यंत चुरशीने झाला. 

सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. त्यात ‘प्रॅक्टिस’च्या ओपारा याने सामन्याच्या १५ मिनिटाला गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर सामन्याच्या २६ व्या मिनिटाला ‘बालगोपाल’च्या प्रतीक पोवार याने पेनल्टी किकवर गोल करून संघाला बरोबरी मिळवून दिली. त्यावर पुन्हा दोन्ही संघांनी गोल नोंदवून आघाडी मिळविण्यासाठी चढायांचा वेग वाढविला. त्यात सामन्याच्या ४० व्या मिनिटाला ‘प्रॅक्टिस’च्या कैलास पाटील याने गोल करून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

पूर्वार्धात ती आघाडी कायम राहिली. उत्तरार्धात ‘बालगोपाल’च्या लकी याने रोहित कुरणे याच्या पासवर सामन्याच्या ४६ व्या मिनिटाला गोल करून संघाला बरोबरी मिळवून दिली. त्यावर पुन्हा दोन्ही संघांकडून वेगवान खेळ सुरू झाला. त्यात ‘प्रॅक्टिस’कडून सागर चिले याने सामन्याच्या ५३ व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी ३-२ अशा गोलने वाढविली.

या गोलची आघाडी ‘बालगोपाल’च्या लकी याने पुन्हा रोहित कुरणे याच्या पासवर सामन्याच्या ५६ मिनिटाला गोल नोंदवून कमी केली. त्यानंतर तिसऱ्या मिनिटाला कैलास पाटील याच्या पासवर ओपारा याने चेंडूला गोलजाळीत धाडून ‘प्रॅक्टिस’ला ४-३ अशा गोलने आघाडी मिळवून दिली.

उर्वरित ही आघाडी कायम राहिल्याने ‘प्रॅक्टिस’ विजयी झाले. दरम्यान, दुपारी झालेला ‘पीटीएम’(ब) आणि ‘उत्तरेश्वर प्रासादिक’ यांच्यातील सामना १-१ अशा गोलने बरोबरीत सुटला. त्यात ‘पीटीएम’कडून रोहित पोवार, तर ‘उत्तरेश्वर प्रासादिक’कडून ओंकार लोकरे याने गोल नोंदविला. ‘सी’ डिव्हिजनमधील नोंदणीसाठी फुटबॉलपटूंची केएसए कार्यालयाबाहेर रांग लागली होती.

आजचे सामनेखंडोबा तालीम मंडळ विरूद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ (दुपारी ३.४५ वाजता)

‘प्रॅक्टिस’ (अ) दहा गुणांवरया स्पर्धेत आतापर्यंत प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने (अ) पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यांत विजय, एक पराभव आणि एक सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे हा संघ १0 गुणांवर आहे. बालगोपाल तालीम मंडळाने आतापर्यंत पाचपैकी तीन सामन्यांत विजय मिळविला. दोन सामन्यांत या संघाचा पराभव झाला. हा संघ नऊ गुणांवर आहे.

 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर