कोल्हापूर : पॅन्टालुन्स, राजारामपूरी येथील शाखेसमोर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमधील लॅपटॉपची बॅग दोघा चोरट्यांनी हातोहात लंपास केली. चालकाला तुमचे पैसे खाली पडले आहेत, अशी बतावणी करुन चोरट्यांनी संधी साधली. हा प्रकार गुरुवार (दि. २२) रोजी रात्री घडली.अधिक माहिती अशी, गजानन बाळासाहेब निकम (वय २९, रा. कन्नड, जि. औरंगाबाद, सध्या रा. पुणे) हे डिझानिंगची कामे करतात. कोल्हापूरात पॅन्टालुन्स शोरुमचे काम करण्यासाठी ते गुरुवारी आले होते. कार पार्किंग करुन ते शोरुममध्ये गेले. रात्री काम आवरुन ते सांगलीला निघाले.
यावेळी त्यांच्या मोबाईलची बॅटरी संपल्याने चार्जर काढण्यासाठी पाठिमागील सीटवर ठेवलेली बॅग घेण्यासाठी मागे वळून पाहिले असता ती नव्हती. कारमध्ये खाली कुठे पडली आहे, काय याचा शोध घेतला. यावेळी चालक योगेश भुजबळ यांनी कोल्हापूरात शोरुमच्या बाहेर कार पार्किंग केली असता एक तरुणाने तुमचे पैसे पडले आहेत, असे सांगितले होते.
मी खाली उतरुन पुढे पडलेली दहा रुपयांची नोट उचलली. पुन्हा कारमध्ये येवून बसलो. बॅग चोरीचा संशय आलेने निकम यांनी पुन्हा कोल्हापूरात येवून शोरुमच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहिले. त्यामध्ये कारच्या सभोवती चौघे तरुण आले. त्यापैकी एकाने दहा, वीस रुपयांच्या नोटा कारच्या स्वभोवती टाकल्या.
दोघेजण पुढे जावून थांबले. चौदा कारच्या पाठिमागील दरवाजाजवळ थांबुन राहिला. चालक खाली उतरुन गेलेनंतर दरवाजाजवळ उभ्या असलेल्या तरुणाने कारमधील बॅग घेवून चौघे टाकाळाच्या दिशेने निघून गेलेचे दिसले.
या चौघा चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत असून ते ३० ते ३५ वयोगटातील आहेत. निकम यांनी राजारामपूरी पोलीसांत फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम अधिक तपास करीत आहेत.