शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

कोल्हापूर :  दहा महिन्यांत अडीच कोटींचा मद्यसाठा जप्त, कारवाईचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 5:06 PM

गेल्या दहा महिन्यांत गोव्याहून विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह चालकांवर कारवाई करून सुमारे अडीच कोटी किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

ठळक मुद्देदहा महिन्यांत अडीच कोटींचा मद्यसाठा जप्तदोन दिवस पथकाचा कारवाईचा धडाका

कोल्हापूर : गेल्या दहा महिन्यांत गोव्याहून विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह चालकांवर कारवाई करून सुमारे अडीच कोटी किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.गोव्याहून येणाऱ्या चंदगड-आंबोली, कर्नाटक-कागल, राधानगरी-फोंडा आणि गगनबावडा या चार मार्गांवरून विदेशी दारुची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. गोव्यामध्ये दारुचे दर कमी असल्याने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतील फंटर या ठिकाणांहून ट्रक भरून मद्यसाठा आणत असतात.

तिलारी, गगनबावडा, दाजीपूर, हिरणी, आजरा या नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारीपथक व स्थानिक पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे. भरारी पथक एस. टी. बस, ट्रॅव्हल्स गाड्या व खासगी वाहनांची कसून तपासणी करीत असताना, गेल्या दहा महिन्यांत अडीच कोटी किमतीचा मद्यसाठा मिळून आला आहे.दरम्यान, सोमवारी भरारी पथकाचे निरीक्षक एस. एस. साळवे, दुय्यम निरीक्षक डी. एस. चव्हाण यांनी किणी (ता. हातकणंगले) येथे तवेरा (एम. एच. १२ डीवाय -४९६१) या वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा बनावटी मद्याचे ५0 बॉक्स मिळून आले. बाजारपेठेत या मद्याची साडेतीन लाख रुपये किंमत आहे.

वाहनचालक किशोर रमेश खेडेकर (वय २३, रा. रा. राजेबाचा मळा, गुरहोली, ता. पुरंदर, जि. पुणे) याला अटक केली. तो हा मद्यसाठा कोणाला नेऊन देणार होता. यासंबंधी चौकशी करीत आहेत. मद्यसाठ्यासह तवेरा वाहनही पथकाने जप्त केले. सलग दोन दिवस पथकाने कारवाईचा धडाकाच लावला आहे. 

 

टॅग्स :liquor banदारूबंदीkolhapurकोल्हापूर