शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

कोल्हापूर : तुम्ही साथ द्या, ‘कोल्हापूर दक्षिण’मधून लढण्यास मी तयार : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 5:19 PM

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही आणि मी गाफील राहिल्याने माझा बळी गेला. मात्र, आता गट-तट बाजूला सारून, मतभेद दूर करून तुम्ही साथ देणार असाल, तरच ‘कोल्हापूर दक्षिण’मधून २०१९ ची निवडणूक लढविण्यास मी तयार आहे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.

ठळक मुद्देतुम्ही साथ द्या, ‘कोल्हापूर दक्षिण’मधून लढण्यास मी तयार : सतेज पाटीलमतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा

कोल्हापूर : गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही आणि मी गाफील राहिल्याने माझा बळी गेला. मात्र, आता गट-तट बाजूला सारून, मतभेद दूर करून तुम्ही साथ देणार असाल, तरच ‘कोल्हापूर दक्षिण’मधून २०१९ ची निवडणूक लढविण्यास मी तयार आहे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.येथील ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्कमध्ये आयोजित कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण विभागामधील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. करवीर आदर्श महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा प्रतिमा पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, समाजातील सर्व घटकांना फसविणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर सारण्यासाठी आगामी निवडणूक महत्त्वाची आहे. सामान्य माणसाला न्याय आणि दक्षिण मतदारसंघातील विकासकामांना गती देण्यासाठी मी विधानसभा निवडणूक लढवीन. मात्र, त्यासाठी तुमची साथ महत्त्वाची आहे. तुम्ही पुन्हा गाफील राहणार असाल, तर मला पुन्हा विषाची परीक्षा घ्यायला लावू नका. माझा बळी देऊ नका. विधानपरिषदेची माझी आमदारकी २०२२ पर्यंत आहे. जर, विधानसभेची लढाई ताकदीने लढायची असेल, तर तत्पर रहा. ‘घरोघरी काँग्रेस’ मोहिमेच्या माध्यमातून लोकांशी संपर्क वाढवा.या मेळाव्यात बाजार समितीचे संचालक विलास साठे, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील, राजू वळीवडेकर, संदीप मोहिते, संजय पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांना ‘कोल्हापूर दक्षिण’चे आमदार करण्याची शपथ घेतली. यावेळी करवीर पंचायत समितीचे सभापती प्रदीप झांबरे, उपसभापती सागर पाटील, बाजार समितीचे संचालक मारुती निगवे, शशिकांत पाटील, विजय पाटील, मनीषा वास्कर, बाबासो माळी, एकनाथ पाटील, भूजगोंड पाटील, युवराज गवळी, प्रताप चंदवाणी, सचिन पाटील, विजय चौगुले, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोठ्या संघर्षातून यशज्या नेत्याने जिल्ह्याला वेठीस धरले, लोकसभेमध्ये मदत करूनही ज्यांनी मला फसविले, अशा नेत्याचा पराभव करण्याचा मान मला मिळाला. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर १४ महिन्यांत मोठ्या संघर्षातून मी विधानपरिषदेचा आमदार झालो, हे तुम्हाला माहीत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपल्याला जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत संमिश्र, तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ज्या वॉर्डात आपल्या कार्यकर्त्याला लीड मिळते, त्याच ठिकाणी विधानसभेला कमी मते कशी मिळतात? याचा विचार कार्यकर्त्यांनी करावा. 

 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर