कोल्हापूर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या वतीने (व्हाईट आर्मी) १२१ दीप प्रज्वलित करून ऐतिहासिक बिंदू चौक उजाळला. यावेळी ‘जय हिंद’ अशा घोषणा देत नेताजींना मानवंदना देण्यात आली.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी सायंकाळी ऐतिहासिक बिंदू चौकात जीवन मुक्ती सेवा संस्थेच्या (व्हाईट आर्मी) वतीने १२१ दीप प्रज्वलित करून अभिवादन केले. याप्रसंगी अॅड. धनंजय पठाडे, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, ‘व्हाईट आर्मी’चे संस्थापक-अध्यक्ष अशोक रोकडे, आदी उपस्थित होते.(छाया : नसीर अत्तार)
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या वतीने शहर पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर आणि अॅड. धनंजय पठाडे यांनी बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
याप्रसंगी ‘व्हाईट आर्मी’चे संस्थापक-अध्यक्ष अशोक रोकडे व त्यांच्या पथकांनी मानवंदना देत संचलन केले. या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी सुमारे १२१ दीप प्रज्वलित केल्याने बिंदू चौैक उजाळून निघाला.
या वेळी ‘जय हिंद’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. या कार्यक्रमात व्हाईट आर्मीचे प्रशांत शेंडे, पूजा वाडीकर, प्रणवा टिटवेकर, सचिन शिंदे, विनायक भाट, सुधाकर लोहार, आदींसह स. म. लोहिया, न्यू कॉलेज, महाराष्ट्र हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, शहाजी, कॉमर्स कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते.