कोल्हापूर : लिंगायत समाजाच्या काही पोटजातींचा इतर मागासवर्ग प्रवर्गामध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजूरीसाठी पाठविण्याचा निर्णय आज, गुरुवारी निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर दसरा चौकात लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने साखरेचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुंबईतील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय होताच रात्री आठ वाजता समस्त लिंगायत समाज संघर्ष समितीच्या सदस्या सरलाताई पाटील यांच्या हस्ते दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून नागरिकांना साखरेचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संजय चितारी, अनिल सोलापुरे, नानासाहेब नष्टे, राजेश चंदूरकर, राजू वाली, विवेक शेटे, शिवानंद स्वामी, आदी उपस्थित होते.तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार लिंगायत धर्ममहासभेने लिंगायत समाजाला संविधानिक मान्यता मिळावी व या धर्माला अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्यात यावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला शिफारस करावी, अशी मागणी केली होती. धर्मातील काही पोटजातींचा इतर माागासवर्गात समावेश व्हावा, अशी आमची मागणीच नव्हती त्यामुळे ही मान्यता म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर पाने पुसण्याचा प्रकार आहे. - वैशाली पाटील, महिला राज्याध्यक्ष, लिंगायत धर्म महासभालिंगायत धर्मास संविधानिक मान्यता द्यावी यासाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारने शिफारस करावी, समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा द्यावा, या मूळ मागण्यांना बगल देत राज्य शासनाने समाजाला इतर मागास प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय समाजाला मान्य नाही. कारण यामुळे समाजातील ३८ पैकी १२ जातींनाच लाभ होणार आहे. इतरांचे काय? हे सरकारने स्पष्ट केलेले नाही. सरकारने निवडणुकीच्या तोंडावर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. या विरोधात पुढील आंदोलनाची लवकरच दिशा ठरविण्यात येईल. - बी. एस. पाटील, राज्य सरचिटणीस, लिंगायत धर्मसभाआम्ही शासनाकडे प्रमुख तीन मागण्या केल्या होत्या. या तिन्ही मागणींचा राज्य सरकारने सकारात्मक दृष्ट्या विचार करून हा निर्णय घेतला. त्यामुळे मी राज्य सरकार, प्रशासन व सर्व प्रसारमाध्यमे यांचे आभार मानते. या निर्णयामुळे आमच्या लढयास यश आले आहे. - सरलाताई पाटील, अध्यक्षा, विश्व लिंगायत महासभा, लिंगायत समाज संघर्ष समिती सदस्याआंदोलन तीव्र करूआमची मागणी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी अशी होती. लिंगायत धर्मात ७० जाती आणि ३६० पोटजाती आहेत. त्यापैकी राज्यशासनाने इतर मागासवर्गियात केवळ १२ पोटजातींचा समावेश करून उलट संभ्रमच निर्माण केला आहे. निवडणूकीच्या तोंडावर पाने पुसणाऱ्या शासनाने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करू. - प्रमिला नवणे, महिला जिल्हाध्यक्ष, लिंगायत धर्म महासभा
कोल्हापूर लिंगायत समाजातर्फे ‘आनंदोत्सव’
By admin | Published: August 29, 2014 12:29 AM