Kolhapur Lok Sabha Election 2024 :कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्यावरील टीकेवरुन आता जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. " अजून १४ दिवस आहेत, बंटी पाटील गप्प बसणार नाही. तुम्ही बंटी पाटलावर टीका करा हा पाटील तुम्हाला समर्थपणे उत्तर द्यायला तयार आहे. मात्र शाहू महाराजांची अस्मिता आहे. तुम्ही त्यांना चॅलेंज केलं आहे की विकासाच्या कामावर गप्पा मारायला समोर यावं. पण कशाला त्यांना तुम्ही विनंती करता मी यायला तयार आहे. पाच वर्षात तुम्ही काय केलं आणि पाच वर्षात कोल्हापूरचं काय नुकसान झालं हे सांगायला मी तयार आहे. शाहू महाराजांच्या कार्य कर्तृत्वाची साक्ष तुम्ही मागता म्हणजे तुम्ही किती कृतघ्न आहात अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर टीका केली, या टीकेला मंत्री उदय सामंत यांनी आज प्रत्युत्तर दिले.
मोठी बातमी! मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. संपूर्ण राजकारणाला कलाटणी मिळणारी सभा असणार आहे. 'काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीचे राजकारण केले आहे त्यामुळे हा प्रकार सुरू आहे. ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ केला त्यांचं समर्थन करणाऱ्या ओवेसी यांनी यांना पाठिंबा दिला. ही शोकांतिका आहे मला यावर काही बोलायच नाही. कोल्हापूरात उद्रेक झाला त्यानंतर त्यांनी पाठिंबा नाकारला आहे, अशी टीका उदय सामंत यांनी केली.
"वंचितनेही यांना पाठिंबा दिली, वंचितच्या छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवाराने औरंगजेबाच्या कबरीवर डोक ठेवलं. यामुळे हे काँग्रेसच हे षडयंत्र आहे. महाराजांचा अपमान व्हायला काँग्रेस जबाबदार आहे, असा आरोपही उदय सामंत यांनी केला. अशा वयामध्ये त्यांना राजकारणात राजकीय रणांगणात आणणे माझ्या दृष्टीने काँग्रेसची फार मोठी चूक आहे. काँग्रेसला हे घराण आमच्याकडे आहे हे दाखवायचं असेल. छत्रपती शाहू महाराजांचा अपमान व्हायला काँग्रेसच जबाबदार आहे, असंही उदय सामंत म्हणाले.