शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
3
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
4
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
5
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
6
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
7
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
8
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
9
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
10
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
11
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
12
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
13
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
14
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
15
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
16
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

LokSabha Result2024: कोल्हापूरकरांचं 'मत' अन् 'मान'ही गादीलाच, दीड लाखांवर मताधिक्याने शाहू छत्रपती विजयी

By समीर देशपांडे | Published: June 04, 2024 6:20 PM

करवीर, राधानगरीमुळे लागला महाराजांना गुलाल

कोल्हापूर: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी दीड लाखांवर मताधिक्य घेत बाजी मारली. ७१ हजारावर करवीर विधानसभा तर ६५ हजारहून अधिक राधानगरी विधानसभा मतदारसंघाने दिलेले मताधिक्यच छत्रपतींना गुलाल लावणारे ठरले. याउलट महायुतीचा ज्या विधानसभा मतदारसंघांवर भरोसा होता त्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघात केवळ १४ हजारांचे मताधिक्य मिळाले असून चंदगड मतदारसंघातून तर छत्रपतीच ९ हजारावर मतांनी आघाडीवर राहिले. त्यामुळे ज्या दोन मतदारसंघांवर महायुतीची मदार होती त्याच ठिकाणी महायुतीला रोखण्यात आघाडीला यश आले आणि शाहू छत्रपती खासदार झाले. मतमोजणी अंतिम टप्प्यात असून अंतिम आकडेवारी आलेली नाही. परंतू या मताधिक्यात आता बदल होणार नाही अशीच परिस्थिती आहे.सुरूवातीपासूनच शाहू छत्रपती यांनी प्रत्येक फेरीत जे मताधिक्य घेण्यास सुरूवात केली ते अखेरपर्यंत वाढत गेले. सहाही विधानसभा मतदारसंघाच्या एकत्रित एकाही फेरीत मंडलिक हे मताधिक्य घेवू शकले नाहीत. उलट प्रत्येक फेरीगणिक छत्रपती यांचे मताधिक्य वाढतच गेले. आमदार सतेज पाटील, दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनापासून केलेला प्रचार, राजघराण्याने तोडीस तोड केलेली राबणूक आणि मोठ्या महाराजांबद्दल असणारा आदर यामुळे नरेंद्र मोदी यांच्या सभा होवूनही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आठ मुक्कामही मंडलिक यांना पराभवापासून वाचवू शकले नाहीत.दुसरीकडे पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह दोन आमदार आणि सत्तारूढ म्हणून असणारी ताकदही मंडलिक यांना विजयी करू शकली नाही. ज्या कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या जोरावर मंडलिक निवडून येणार असल्याच्या वल्गना झाल्या याच ठिकाणी महायुतीची गाडी पंक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. शाहू छत्रपती यांच्या विजयाने न्यू पॅलेस परिसर गुलालाने न्हाऊन निघाला असून शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आहे. शाहू छत्रपती यांच्या अभिनंदनाचे फलक सोमवारी दुपारपासूनच मतदारसंघात उभारण्यात आले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीcongressकाँग्रेस