कोल्हापूर : शिक्षण व करिअरचे सर्वोत्तम पर्याय, सर्वांगीण सल्ला आणि सर्वव्यापी उपायांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ या शैक्षणिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी विद्यार्थी, पालकांची मोठी गर्दी केली.
प्रदर्शनाचा रविवारी समारोप होणार असल्याने शिक्षण, करिअर विषयक माहिती घेण्याची ही अखेरची संधी आहे. राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनमध्ये सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन होणार आहे.
करिअरबाबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्याने प्रदर्शनाला मोठी गर्दी होत आहे. प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या आवडीनिवडीची विचारणा करून त्यांना आपल्या संस्थेमधील विविध अभ्यासक्रम, त्यांच्या कालावधीसह शुल्काची सविस्तर माहिती दिली जात आहे.
काही स्टॉलधारकांनी त्यांना चित्रफितींद्वारे अभ्यासक्रमातील विविध संधी, संस्थेच्या परिसराची माहिती दिली. विद्यार्थी, पालकदेखील शंकांचे निरसन करून घेत होते. प्रदर्शनाची वेळ संपेपर्यंत विद्यार्थी, पालकांची गर्दी होती.
दरम्यान, प्रदर्शनस्थळी कलानिकेतन शिक्षण संस्थेतर्फे कॅलिग्राफी, लँडस्केप, पोर्ट्रेट स्केचिंग , टेराकोटा पॉट मेकिंग, आदींबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येत आहे. डॉल्फिन एज्युकेशनल अँड रिसर्च सोसायटीतर्फे ‘इलेक्ट्रॉनिक्सशी दोस्ती’ या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स पार्टस्ची, ‘चला रोबो बनवूया’ अंतर्गत रोबोचे प्रकार, त्यांचे सुटे भाग, आदींच्या रोबो बनविण्याच्या प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.
- * सकाळी १० वाजता : कोल्हापूर एज्युकेशन आयडॉल परीक्षा
- सकाळी ११ वाजता : लोकेश थोरात यांचे मार्गदर्शन (एमपीएससी, यूपीएससी परीक्षेची तयारी)
- दुपारी ३ वाजता : निधी भंडारे यांचे मार्गदर्शन (फाईन आर्ट वर्कशॉप)
- दुपारी ४ वाजता : सानिका डोईफोडे यांचे मार्गदर्शन (फॉरिन लँग्वेजेस अँड इट्स बेनिफिट्स)
- सायंकाळी ५ वाजता : डॉ. भारत खराटे यांचे मार्गदर्शन (उज्ज्वल करिअर करण्यासाठी.)