शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

कोल्हापूर ‘लोकमत महामॅरेथॉन’ : चला, वाढवूया धावपटूंचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 4:15 PM

‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये काही कारणांस्तव ज्यांना सहभागी होता आलेले नाही, त्यांनी निराश होण्याची गरज नाही. या मॅरेथॉनमधील सहभागी धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी तुम्हीदेखील या स्पर्धेत तितक्याच हिरिरीने सहभागी होऊ शकता.

ठळक मुद्देकोल्हापूर ‘लोकमत महामॅरेथॉन’ चला, वाढवूया धावपटूंचा उत्साह

कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये काही कारणांस्तव ज्यांना सहभागी होता आलेले नाही, त्यांनी निराश होण्याची गरज नाही. या मॅरेथॉनमधील सहभागी धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी तुम्हीदेखील या स्पर्धेत तितक्याच हिरिरीने सहभागी होऊ शकता.‘लोकमत महामॅरेथॉन’ ही स्पर्धा कोल्हापूरच्या प्रत्येक नागरिकाची आहे. मॅरेथॉनमध्ये धावण्याबरोबरच या धावपटूंचा उत्साह वाढविणे हासुद्धा मॅरेथॉनचा महत्त्वपूर्ण भाग आहे. तो संपूर्ण शहरवासीयांना पूर्ण करायचा आहे. त्यात आपला सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. जे युवक, युवती काही कारणांस्तव या मॅरेथॉनमध्ये धावणार नसतील, तेदेखील या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ शकतात.

असे युवक, युवती चेहऱ्यांवर रंग लावून, फेटे बांधून व आकर्षक पेहराव करून मार्गावर येऊ शकतात. त्यांना तारुण्याचा सळसळता जोम धावण्याबरोबरच प्रोत्साहन देण्यातही दाखविता येईल. पहाटे, मॅरेथॉन रनर्सना मनापासून ‘चीअर अप’ करता येईल. जे शहरवासीय, नागरिक धावणार नाहीत, ते आपल्या घराबाहेर येऊन मॅरेथॉन मार्गावर उभे राहून धावणाºयांचा उत्साह वाढवू शकतात. कोल्हापूरकरांचे प्रोत्साहनाचे शब्द धावपटूंचा उत्साह आणि ऊर्जा द्विगुणित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

उत्साह वाढविण्यासाठी हे करता येईल...

  1. टाळ्या वाजवून केलेल्या स्वागताने धावपटूंमध्ये उत्साह, ऊर्जा निर्माण करता येईल.
  2. महामॅरेथॉनच्या मार्गावर ढोल-ताशा, गीत-संगीत वाजवून अथवा लेझीम खेळून जल्लोषपूर्ण वातावरण तयार करू शकता.
  3.  या माध्यमातून परराज्यांतून, जिल्ह्यातून येणाऱ्या धावपटूंना कोल्हापूरकरांचे आदरातिथ्य अनुभवण्याची संधी मिळेल.
  4. महामॅरेथॉनमधील नामांकित धावपटूंना पाहून शाळकरी मुलांना मोठी प्रेरणा मिळू शकते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तेथील विद्यार्थी भविष्यात आंतरराष्ट्रीय धावपटू बनू शकतात. त्यासाठी शाळकरी मुलांनी मॅरेथॉन मार्गावर उभे राहून धावपटूंचे मनोबल वाढवावे.

 

मॅरेथॉन मार्गावर नृत्य-संगीत, मर्दानी खेळमॅरेथॉन मार्गावर नृत्य, संगीत, हलगीवादन, ढोल-ताशा, लेझीम, मर्दानी खेळ, आदी मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सोबतचा झुम्बा डान्स धावपटूंमध्ये धावण्यासाठी ऊर्जा निर्माण करणार आहे. मॅरेथॉनच्या मार्गावर लेझीम, ढोल-ताशे, गाणे, संगीत वाजवून, लेझीम खेळून जल्लोषपूर्ण वातावरण ठेवले जाणार आहे.

निरोगी आरोग्यासाठी व्यायाम आवश्यकग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने सन २००१ मध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘विद्याप्रबोधिनी’ची कोल्हापुरात सुरुवात झाली. प्रबोधिनीतर्फे एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, एमबीए, आदी परीक्षांसह करिअरबाबत मार्गदर्शन केले जाते. शासकीय अधिकाऱ्यांच्या सक्सेस स्टोरीज, त्यांची व्याख्याने, चर्चासत्रे, प्रेरणादायी वक्त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जाते. दिल्ली, मुंबई, पुणे येथील तज्ज्ञांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले जाते. विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध आहे. आतापर्यंत क्लार्क ते अधिकारी या पदांच्या परीक्षेत प्रबोधिनीचे ७० हून अधिक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सध्याच्या धावपळ आणि ताणतणावाच्या स्थितीत निरोगी जीवनशैलीसाठी व्यायाम गरजेचा आहे. त्या दृष्टीने आरोग्याबाबत सजग करणारा ‘लोकमत’चा महामॅरेथॉन हा उपक्रम उल्लेखनीय आहे. निरोगी आरोग्यासाठी व्यायाम आणि निरोगी मनासाठी वाचन हे महत्त्वाचे आहे.- राहुल चिकोडे, अध्यक्ष, विद्याप्रबोधिनी

 

टॅग्स :Lokmat Kolhapur Maha Marathonलोकमत कोल्हापूर महामॅरेथॉनkolhapurकोल्हापूर