कोल्हापूर : मेकर ग्रुप कंपनीकडून झालेल्या फसवूणकीबाबत कोणत्याही स्थितीत मागे न हटण्याचा निर्धार कोल्हापूरात विरोधी कृती समितीने शुक्रवारी केला.टाऊन हॉल येथे मेकर ग्रुप इंडिया विरोधी कृती समितीचा मेळावा दूपारी झाला.अध्यक्षस्थानी नाथाजीराव पवार होते. मेळाव्यात शाहूपुरी पोलिसात या कंपनीविरुद्ध तक्रार देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.ठेवीवर भरमसाट व्याज, आलिशान गाड्यांची बक्षिसेमधून आणि ग्राहकांना भुलविणाऱ्या योजना आदी कंपनीकडून केले आहे. साधारणत : ५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कोल्हापूर, सांगली, बेळगांव आदी भागातून महिला ठेवीदार मेळाव्याला आल्या होत्या. यावेळी नाथाजीराव पवार यांनी, फसवणूकीबाबतची माहिती सांगून मार्गदर्शन केले. यावेळी सर्वांनी एकत्रित लढण्याचा निर्धार केला.मेळाव्यास संजय सुतार, अभिनंदन धरणगुत्ती, संजय दुर्गे, स्मिता जाधव, आश्लेषा कोळी, पाकिजा शिकलगार, लक्ष्मी नलवडे, मंगल पाटील यांच्यासह ठेवीदार, एजंट उपस्थित होते.