शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

कोल्हापूर : महापौर, उपमहापौर कार्यकर्त्यांसह पायी रॅलीने महापालिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 6:06 PM

सतत वाढत निघालेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीचे पुकारलेला ‘नो व्हेईकल डे’ पाळत शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकापासून महापालिकेपर्यत पायी रॅली काढली. यामध्ये महापौर शोभा बोंद्रे व उपमहापौर महेश सावंत हे कार्यकर्त्यांसह सहभागी झाले.

ठळक मुद्देमहापौर, उपमहापौर कार्यकर्त्यांसह पायी रॅलीने महापालिकतपेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध: सर्वपक्षीय कृती समितीने पुकारला ‘नो व्हेईकल डे’

कोल्हापूर : सतत वाढत निघालेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीचे पुकारलेला ‘नो व्हेईकल डे’ पाळत शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकापासून महापालिकेपर्यत पायी रॅली काढली. यामध्ये महापौर शोभा बोंद्रे व उपमहापौर महेश सावंत हे कार्यकर्त्यांसह सहभागी झाले. ‘पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा’ अशा घोषणा देत मोदी सरकारचा निषेध करत टाळ-मृदुगांच्या निनादात ही पायी रॅली काढली.पेट्रोल-डिझेलसह दरवाढीच्या निषेधार्थ महापौर शोभा बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली व्यापक आंदोलनाचा एक भाग म्हणून मंगळवारी पहिल्या टप्प्यात ‘नो व्हेईकल डे’ पाळून शासनाच्या निषेधार्थ पायी रॅली काढली.उभा मारुती चौकातून हालगीच्या कडकडाटात पायी रॅलीचा प्रारंभ झाला. रॅलीचे नेतृत्व महापौर शोभा बोंद्रे, उपहापौर महेश सावंत, कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी केले. त्यानंतर ही रॅली बिनखांबी गणेश मंदीर, महाद्वार रोड, पापाची तिकटी मार्गे महापालिकेत पोहचली.

रॅलीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांसह सभागृह नेता दिलीप पवार, काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, माजी महापौर स्वाती यवलूजे, अ‍ॅड. चारुलता चव्हाण, बाबा पार्टे, अशोक पोवार, बाबुराव कदम, मारुतराव कातवरे, पारस ओसवाल, सुभाष कदम, बाबासाहेब देवकर, रविंद्र चव्हाण, नामदेवराव गावडे, सुभाष जाधव, आदील फरास, दिलीप माने आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनाची व्याप्ती वाढविणार : महापौरपेट्रोल-डिझेलची वारंवार होणारी दरवाढ अन्यायी असून सुस्तावलेल्या शासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून येत्या दोन दिवसात दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन करुन शासनाला दरवाढ मागे घेण्यास भाग पाडू, असे महापौर बोंद्रे म्हणाल्या.

शासनाला दखल घ्यावी लागेल : उपमहापौरकोल्हापूरातून होणाऱ्या कोणत्याही आंदोलनाची शासनाला दखल घ्यावी लागते. त्याप्रमाणे आंदोलनाची तीव्रता वाढवून शासनाला निश्चितच दखल घ्यावी लागेल, असे उपहामहापौर महेश सावंत म्हणाले.

‘सस्ती दारु महंगा पेट्रोल’पायी रॅलीमध्ये एका अंपगाच्या सायकलीसह अनेक युवक-युवतीही सहभागी झाले होते, अनेकांच्या हातातील निषेधाचे फलक लक्षवेधी होते, त्यामध्ये ‘वाह रे सरकार सस्ती दारु महंगा पेट्रोल’ हा फलक साऱ्यांच्या चर्चेचा ठरत होता.

‘अच्छे दिन कसले रे बाबा, महागाईनं मारले बाबा’पायी रॅलीमध्ये टाळ, मृदुंग तसेच हालगीच्या ठेक्यावर शिवाजी पेठेतील काही कार्यकर्त्यांनी केलेले सोंगी भजन आकर्षक ठरले. ‘अच्छे दिन कसले रे बाबा, महागाईनं मारले बाबा’अशा निषेधाच्या गाण्याच्या सुरावर हे भजनी मंडळातील कार्यकर्ते नाचत आपली कला सादर करत होते.आयुक्तांचा निषेधमहापालिकेच्या चौकात झाल्यानंतर निषेध सभेत माजी महापौर आर. के. पोवार यांनी, रॅलीमध्ये सहभागी न होण्याबाबत मोबाईलवरुन अधिकारी व कर्मचाऱ्यांना मेसज पाठवून दम दिल्याबद्दल आयुक्तांचा सभेत निषेध केला.

दरम्यान, आयुक्तांचा निषेध करण्यावरुन कार्यकर्त्यात मतभेद दिसून आले. सतिशचंद्र कांबळे यांनी आयुक्तांचा निषेध नोंदवावा असे ओरडून सांगितले असता बाबा पार्टे यांनी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहने आणली नसल्याचे सांगून निषेध नको असे सांगितल्याने त्यांच्यात काहीवेळ मतभेद सुरु होते.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर