कोल्हापूर : चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले धरणे आंदोलन सातव्या दिवशीही सुरू राहिले. संघटनेच्यावतीने राज्यभर हे आंदोलन सुरू असून मागण्या मान्य झाल्याशिवाय ते मागे घेण्यात येणार नाही असा निर्धार यावेळी करण्यात आला.गुरुवारपासून राज्यभरात कोतवाल संघटनेतर्फे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून, जिल्ह्यातील कोतवालांनी कामबंद करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. आमच्याकडून गेल्या ५०-६० वर्षांपासून हावातील महसुलाची कामे करून घेतली जात आहेत मात्र त्याचा शासकीय कर्मचाऱ्यांंप्रमाणे कोणताही लाभ मिळत नाही. त्यामुळे शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाºयांप्रमाणे शासनाचे सर्व लाभ मिळावेत,अशी मागणी संघटनेने केली आहे.आंदोलनात संदीप टिपुगडे, श्रीकांत कोळी, अतुल जगताप, सुनील पाटील, महादेव भोसले, पांडुरंग बरकाळे, संतोष पाटील, दीपक शिंदे, पांडुरंग डवरी, उमेश कांबळे, बाजीराव कांबळे, नामदेव चौैगले यांच्यासह कोतवाल मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.