शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

कोल्हापूर :मुहूर्त ‘शक्ति’प्रदर्शनचा !

By admin | Published: September 25, 2014 1:03 AM

जोरदार तयारी : इच्छुक उमेदवार आज, उद्या अर्ज भरणार उमेदवारी

कोल्हापूर : मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असलेल्या जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पितृ पंधरावडा तसेच अमावास्या संपल्याने उमेदवारांनी उद्यापासून अर्ज भरण्याचे नियोजन केले आहे. मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या हेतूने शहरातून मिरवणुका काढण्याचे उमेदवारांनी ठरविले आहे. उद्या तसेच शुक्रवारी सर्वच मतदारसंघांत उमेदवार मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज भरणार आहेत. दरम्यान, आज जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत चार उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला टप्पा पूर्ण व्हायला आता केवळ तीन दिवस बाकी उरले आहेत. त्यामुळे या तीन दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्यास झुंबड उडणार आहे. पितृ पंधरावडा असल्याने गेल्या चार दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. उद्या घटस्थापना झाल्यापासून शनिवारपर्यंत अर्ज भरले जाणार आहेत. सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज भरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. कोल्हापूर उत्तरमधील शिवसेनेचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर हे उमेदवारी अर्ज शुक्रवारी सकाळी दाखल करणार आहेत. त्यासाठी पेटाळा येथे शिवसैनिक व भाजप कार्यकर्त्याना येण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस पक्षातर्फे कोल्हापूर उत्तरमधून निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेले नगरसेवक सत्यजित कदम उद्या (गुरुवारी) सकाळी अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहेत. परंतु ते उद्या कोणतेही शक्तिप्रदर्शन करणार नाहीत. शुक्रवारी मात्र कदम शक्तिप्रदर्शन करणार असून दसरा चौक येथून मिरवणुकीने अर्ज भरण्यास जाणार आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार रघुनाथ कांबळे शुक्रवारी अर्ज भरणार आहेत. त्यांनीही शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरविले आहे. भाकप, माकपसह डाव्या आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना शुक्रवारी सकाळी बिंदू चौक येथे जमण्यास सांगण्यात आले आहे. बिंदू चौक येथून रघुनाथ कांबळे मिरवणुकीने उमेदवारी अर्ज करण्यास जाणार आहेत. दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तपोवन ग्राऊंड येथून मिरवणूकीने जावून जोरदार शक्तिप्रदर्शनाने ते भवानी मंडपातील निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत. करवीर मतदारसंघातून काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील हे गांधी मैदान येथे एकत्रित येऊन शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज मध्यवर्ती शासकीय इमारत येथील निवडणूक कार्यालयात दाखल करणार आहेत. आमदार चंद्रदीप नरके हे ‘करवीर’मधून शिवसेनेच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुधाळी मैदान येथे एकत्रित येऊन शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. जनसुराज्य-शेकापचे उमेदवार राजेंद्र गुंडाप्पा सूर्यवंशी हे उद्या, गुरुवारी साध्या पद्धतीने अर्ज दाखल करणार आहेत. (प्रतिनिधी)