कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका शहर पाणीपुरवठा विभागाकडील थकीत पाणीपट्टी वसुली मोहिमेअंतर्गत सुमारे ४४८ थकबाकीदारांवर कारवाई करून त्यांच्या २१ नळजोडण्या बंद करण्यात आल्या; तर ४७ लाख ९० हजार ५११ इतक्या रकमेची दंडासह थकबाकी वसूल करण्यात आली. छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाने २८ लाखांची थकबाकी भरली.नळजोडणी बंद केलेल्यांमध्ये हौसाबाई श्रीपती जाधव, सिद्धाप्पा लक्ष्मण थोरवत, विष्णू भाऊ गावडे, मीना विश्वास कांबळे, यल्लाप्पा कृष्णात कांबळे, मिलिंद रामचंद्र डिग्रजकर, महेश वसंत रतन, दिनकर कृष्णा घोरपडे, सुजाता रंगराव आळवेकर, आयरेकर, इत्यादींचा समावेश आहे.
विक्रमनगर, टेंबलाईवाडी परिसर, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, ताराबाई पार्क, शिवाजी पेठ, गंगावेश परिसर या भागातील थकबाकीदारांवर नळजोडणी बंद करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच सी. पी. आर. रुग्णालय यांनी नळजोडणी थकबाकीपैकी २८ लाख रुपयांची थकबाकी भरून महानगरपालिकेस सहकार्य केले. पाणी बिल थकबाकीधारक यांनी पाणी बिल भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कारवाई अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, जल अभियंता सुरेश कुलकर्र्णी, उपजल अभियंता कुंभार व अधीक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकप्रमुख मोहन जाधव, रणजित संकपाळ, उदय पाटील, ताजुद्दीन सिदनाळे, मीटर रीडर पंडित भदुलकर, गणेश देसाई, रमेश मगदूम यांनी कारवाईमध्ये भाग घेतला.महापालिकेच्या वतीने अण्णासाहेब लठ्ठे जयंती साजरीदिवाणबहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने शनिवारी ताराबाई पार्क येथील दिवाणबहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे यांच्या पुतळ्यास विरोधी पक्षनेता किरण शिराळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, जैन बोर्डिंगचे संजय शेटे, डॉ. धनंजय गुंंडे, सुरेश रोटे, विजयकुमार शेट्टी, प्राचार्य श्रीधर हेरवाडे, अनिल ठिकणे, राकेश निल्ले, एन. बी. पाटील, सत्यजित पाटील, दशरथ सांगावकर, जितेंद्र शिरोळकर, राजकुमार चौगुले, सरोजनी होसकल्ले, कांचन भिवटे, वनिता पाटील, दीप्ती चौगुले, सावनी चौगुले, रत्नप्रभा दुग्गे, छाया जदै, डॉ. संपत कुमार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.