कोल्हापूर : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील स्वच्छतेबाबतचे सर्वेक्षण करण्याकरीता ८ ते १० फे बु्रवारी या काळात सरकारनियुक्त त्रयस्थ समितीचे पथक कोल्हापुरात येणार आहे. त्यादृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.
राष्टÑीय पातळीवर केंद्र सरकारने महानगरपालिका हद्दीतील स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्पर्धा आयोजित केली आहे. त्याच्या अनुषंगाने गेल्या दोन महिन्यांपासून महापालिका आरोग्य विभागाने शहरात जनजागृती केली असून ठिकठिकाणी स्वच्छतेचे फलक लावले आहेत. सार्वजनिक शौचालये स्वच्छ केली असून काहींची रंगरंगोटी केली आहे. महापालिकेने ‘स्वच्छ भारत अॅप’ सुरू केले असून त्यावर येणाºया नागरिकांच्या तक्रारी चोवीस तासांत निरसन केल्या जात आहेत.
शहराच्या सर्व प्रभागांत घंटागाडी नियमितपणे सुरू करण्यात आलेल्या असून दैनंदिन कचरा उठावाचे विशेष नियोजन केले आहे. सार्वनिक शौचालयात पाण्याची सुविधा देण्यात आली आहे. कचरा वाहून नेणाºया गाड्या सक्षम करण्यात आलेल्या आहेत.
कें द्र सरकारने एका त्रयस्थ कंपनीला स्वच्छतेचे सर्वेक्षण करण्याचे काम सोपविले आहे. या कंपनीचे एक पथक दि. ८ ते १० फेबु्रवारी या काळात कोल्हापुरात येऊन स्वच्छतेच्या बाबतीत ५४ मुद्द्यांवर तपासणी करणार आहे.या स्पर्धेच्या अनुषंगाने महापालिका आरोग्य विभागाने जोरदार तयारी केली असली तरी ओल्या व सुक्या कचराची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची यंत्रणा मात्र महापालिकेने अद्याप विकसित केलेली नाही. कचºयापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प येत्या ३१ मार्चपर्यंत पूर्ण करून प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे. सध्या या प्रकल्पाची मशिनरी जोडण्याचे काम सुरू आहे.