शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

कोल्हापूर महापालिका : ‘स्थायी’तील गद्दारीची नेतृत्वाने चौकशी करावी: ए. वाय. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 7:04 PM

कोल्हापूर महापालिका स्थायी समिती सभापती निवडीतील पराभवाने आम्ही खचणार नाही, पण पक्षाची झालेली पिछेहाट जिव्हारी लागल्याची खंत व्यक्त करत पक्षात राहून ज्यांनी गद्दारी केली, त्याची चौकशी पक्ष नेतृत्वाने करून योग्य निर्णय घ्यावा. असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.

ठळक मुद्दे‘स्थायी’तील गद्दारीची नेतृत्वाने चौकशी करावी: ए. वाय. पाटीलपराभवाची खंत नाही पण पक्षाची पिछेहाट जिव्हारी

कोल्हापूर : महापालिका स्थायी समिती सभापती निवडीतील पराभवाने आम्ही खचणार नाही, राजकारणात असे अनेक चढउतार पाहिले असून मुले, स्नुषा सह्याद्रीसारखे पुन्हा उभे राहतील. पण पक्षाची झालेली पिछेहाट जिव्हारी लागल्याची खंत व्यक्त करत पक्षात राहून ज्यांनी गद्दारी केली, त्याची चौकशी पक्ष नेतृत्वाने करून योग्य निर्णय घ्यावा. असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.राष्ट्रवादीच्या पक्षातंर्गत निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्याबरोबरच निरीक्षकांची नेमणूक करण्यासाठी सोमवारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे निरीक्षक, सांगली जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील होते.सुन स्थायी सभापती पदासाठी उभी असतानाही ए. वाय. पाटील हे शरद पवार यांच्या दौऱ्यात मग्न होते. इतका निष्ठावंत जिल्हाध्यक्ष आपण पाहिला नसल्याचे सांगत माजी खासदार निवेदिता माने यांनी ‘स्थायी’ निवडणूकीतील नाट्याला हात घातला.

आपल्या पराभवापेक्षा मुले, स्रुषाचा पराभव फार जिव्हारी लागतो. पक्षातील छुपी मंडळी पाय ओढण्याचे काम करत असल्याने पक्षाला गालबोट लागते. नेता सक्षम असल्याशिवाय बळ मिळत नाही, याचे भानही ‘त्या’ मंडळींनी ठेवले पाहिजे.पक्षाचा अहवालासह सभासद नोंदणीचे काम राज्यात पहिल्यांदा पुर्ण केल्याबद्दल सरचिटणीस अनिल साळोखे यांचा कौतुक करत ए. वाय. पाटील म्हणाले, ‘स्थायी’तील घडामोडीबाबत आतापर्यंत बोललो नाही आणि बोलणारही नव्हतो, पण निवेदिता माने यांनी विषयाला हात घातल्याने बोलणे क्रमप्राप्त ठरते.

पक्ष स्थापनेपासून नेतृत्व देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. ‘स्थायी’तील प्रकाराची खंत नाही, माझी मुले, स्रुषा सह्याद्रीसारखे उभे राहतील. चिंता पक्षाच्या अवमान व पिछेहाटाची असून गद्दारीची चौकशी नेतृत्वाने करावी. योग्य वेळी सगळे बोलूच, पण नेतृत्वाने पाठीवर हात ठेवून केवळ लढ म्हणावे, जिल्हा राष्ट्रवादीमय करू.निरीक्षक दिलीप पाटील म्हणाले, भाजप सरकारच्या काळात देशभरात ६५ हजार कोटीचे घोटाळे झाले आहेत. दोन्ही कॉँग्रेसची शक्तीस्थळे असलेला सहकार संपवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. सरकारच्या धोरणाने सामान्य माणूस मेटाकुटीला आला असून राष्ट्रवादी कॉग्रेसला चांगले दिवस येणार आहेत.

माजी आमदार के. पी. पाटील, नामदेवराव भोईटे, बाबासाहेब पाटील, अनिल साळोखे, भैया माने, युवराज पाटील, संगीता खाहे, रोहित पाटील, शिवाजी देसाई आदी उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष मधूकर जांभळे यांनी आभार मानले.

कोल्हापूरातील नेते फारच मोठेकोल्हापूरातील पक्षाच्या नेत्यांच्या टीकाटिपणीच्या बातम्या रोज वाचतो, आमच्या जिल्ह्यात असे धाडस कोणात नाही. निरीक्षक म्हणून आपण कोणाविरोधात तक्रार करणार नाही, कारण पवारसाहेंबांनीच आता येथे लक्ष घातले आहे. ते दौऱ्यावरून परत गेल्यानंतर लगेच राजकीय टोलेबाजी सुरू झाली, इतके मोठे नेते येथे आहेत. पण पक्षाच्या चौकटीत राहून काम करतील, असे अपेक्षा करतो, असा टोला दिलीप पाटील यांनी हाणला.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर