शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

कोल्हापूर :​​​​​ मर्डर फेसबूकवर आणि प्रत्यक्षातही..पाचगांव परिसर पुन्हा हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 4:26 PM

तुमचा मृत्यू कसा होणार हे जाणून घ्या अशी लिंक फेसबूकवर प्रतिक पोवार यांने २७ मार्च २०१८ ला रात्री १० वाजून २६ मिनिटांने डाऊनलोड करुन पाहिली असता त्यामध्ये ‘मर्डर’ होणार असे भविष्य दाखवण्यात आले होते. प्रत्यक्षात पावणेदोन महिन्यांतच आणि तो ही रात्रीच त्याचा मर्डर झाल्याने फेसबूकवरील या लिंकची चर्चा झाली.

ठळक मुद्देमर्डर फेसबूकवर आणि प्रत्यक्षातही..पाचगांव परिसर पुन्हा हादरलागुंडांच्या वर्चस्ववादातून तरुणाचा गोळ्या झाडून खून

कोल्हापूर/पाचगांव :​​​​​ तुमचा मृत्यू कसा होणार हे जाणून घ्या अशी लिंक फेसबूकवर प्रतिक पोवार यांने २७ मार्च २०१८ ला रात्री १० वाजून २६ मिनिटांने डाऊनलोड करुन पाहिली असता त्यामध्ये ‘मर्डर’ होणार असे भविष्य दाखवण्यात आले होते. प्रत्यक्षात पावणेदोन महिन्यांतच आणि तो ही रात्रीच त्याचा मर्डर झाल्याने फेसबूकवरील या लिंकची चर्चा झाली.

प्रतिक उर्फ चिंटू प्रकाश पोवार (वय २८,रा. शांतादुर्गा कॉलनी, द्वारकानगर, पाचगांव, ता. करवीर) असे खुन झालेल्या तरुणाचे नांव आहे. जरगनगर नाका लेआऊट क्रमांक चार मुख्य रस्त्यावर हा खून झाला. घटनास्थळी पोलिसांनी एक पुंगळी जप्त केली आहे.

 संशयित आरोपी प्रतिक सरनाईक याने टाकलेल्या फेसबूक पोस्टचीही चांगलीच चर्चा झाली. कांही गोष्टी मनांत आणि कांही डोक्यात,प्रत्येक गोष्टीचा रिप्लाय देणारच अशी फेसबूक पोस्ट त्यांने शेअर केली आहे व त्याला त्याने रिल्व्हॉवरचे चिन्ह वापरले होते. त्यामुळे रिल्व्हॉवरनेच काटा काढायचा असे प्लॅनिंग त्याच्या डोक्यात होते असे दिसते.

फूटावरून गोळी..प्रतिक पोवार याला संशयितांने अगदी जवळून म्हणजे फुटावरून गोळी झाडल्याचे कांही प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना सांगितले. खून झाला तेव्हा संशयित सरनाईक हा टी शर्ट व बर्म्युडा घालून आला होता व बर्म्युडया खिशातच रिव्हॉल्वर होते अशीही माहिती तपासात पुढे आली आहे.

जरगनगरात पोलिस बंदोबस्त...खूनाच्या घटनेनंतर जरगनगर-आर. के. नगरकडे रस्त्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले होते. खूनाच्या घटनेमुळे सोमवारी दिवसभर या परिसरात तणावपूर्ण शांतता होती.

प्रतिक पोवारचा प्रेम विवाह..प्रतिक पोवार हा भूखंड विक्रीचा व्यवसाय करत होता. व्हिडीओ गेमही तो चालवित होता. त्याचा चार वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला आहे. त्यास दोन लहान मुले आहेत.

पोलिस चौकीजवळच अड्डाआर.के.नगर पोलिस चौकीजवळच पाचगांव रोडवर एका बंद पडलेल्या मोठ्या वित्तीय कंपनीच्या दोन पडक्या इमारती आहेत. तिथे या गुंडांचा नेहमीच वावर असतो. गांजा, सिगरेटचा धूर तिथून कायम निघत असे परंतू त्याकडे पोलिसांनी दूर्लक्ष केले होते.

याप्रकरणी संशयित प्रतिक सुहास सरनाईक (रा. साईनगर, पाचगांव ) याचा शोध करवीर पोलिस घेत आहेत. याबाबतची फिर्याद गौरव सतीश वडेर (रा. हरि पार्क गल्ली, नं-१ आर.के.नगर रोड, पाचगांव) यांनी दिली. त्यानुसार प्रतिक सरनाईक याच्यावर खुन, अपहरण, धमकी असे करवीर पोलिसांत गुन्हे दाखल झाले. या खुनाने पाचगांवचा परिसर पुन्हा हादरला.पोलिसांनी सांंगितले,‘प्रतिक पोवार, प्रतिक सरनाईक व रणजित गवळी हे एकेकाळचे जिवलग मित्र आहेत. एकाच मंडळाचे ते कार्यकर्ते. परंतू दोन वर्षापूर्वी त्यांच्यात वितुष्ट आले. त्यातून गवळी व पोवार एकाबाजूला झाले व सरनाईक यांने आपले गुन्हेगारी विश्र्वात स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. तो चोरून गावठी कट्टे विकत असल्याचाही पोलिसांना संशय आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पूर्वी तो जवाहरनगरातील आरसी गॅँगचे काम करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याची पाचगांव,आर. के. नगर या परिसरात मोठी दहशत आहे. त्यातूनच गवळी व सरनाईक यांच्यात खुन्नस तयार झाली.

रविवारी मध्यरात्री जरगनगर ते पाचगांव मुख्य रस्त्यावर प्रतिक सरनाईक व प्रतिक पोवार यांचे मित्र असलेले शुभम राजेश पवार व गौरव सतीश वडेर हे कट्ट्यावर बोलत बसले होते. तिथे प्रतिक सरनाईक आला व या दोघांना येथे का बसलाय म्हणून शिवीगाळ करु लागला. त्यातून वाद झाला. ते दोघे प्रतिक सरनाईकची समजूत घालत असताना तेथे प्रतिक उर्फ चिंटू प्रकाश पोवार व सागर कांबळे हे आले.

सरनाईकने सागरची गळपट्टी धरली व त्यास शिवीगाळ करून धमकावले. म्हणून प्रतिक पोवारने सरनाईकला अडविले. ‘सागर हा माझ्यासोबत आला आहे, त्याला शिव्या देवून नकोस, तु त्याची गळपट्टी सोड ’, असे प्रतिक पोवार हा सरनाईकला सांगत होता. तरीही,सरनाईक हा पुन्हा त्याला शिव्या देवू लागला. या रागातून प्रतिक पोवारने सरनाईकची गळपट्टी धरली. त्यावेळी या दोघांची भांडणे गौरव वडेर व शुभम पवारने सोडविली.

‘मी लघवीला जावून येतो असे सांगून प्रतिक सरनाईक बाजूला गेला व परत आल्यावर त्याने कंबरेला लावलेली रिव्हॉल्वर काढून प्रतिक पोवारच्या डोक्यात गोळया झाडल्या. शुभम आणि गौरववर रिव्हॉल्वर रोखले.‘तुम्ही येथून निघून जावा, नाहीतर तुम्हालाही गोळ््या ठार मारीन अशी धमकी त्याने दिली. सागर कांबळे यास रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्याच्याच दूचाकीवर तो तेथून पसार झाला. त्यामुळे सागरचे अपहरण केल्याचाही गुन्हा पोलिसांत नोंद झाला आहे.मुख्य रस्त्यावरच गोळीचा आवाज झाल्यावर आजूबाजूचे लोक भयभीत होवून जागे झाले. घटनास्थळी प्रतिक पोवार रक्ताच्या थारोळ््यात पडला होता. त्यास स्थानिक नागरिकांनी लगेच सीपीआर रुग्णालयात नेले. परंतू उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

मध्यरात्र असूनही घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. खूनाची घटना समजताच करवीर पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव,पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.घटनास्थळी प्रतिक पोवारची पांढऱ्या रंगाची विनानंबर प्लेटची मोटारबाईक आढळली. ती पोलिसांनी ताब्यात घेतली. ही घटना समजताच जरगनगर परिसरातील नागरिकांनी आणि प्रतिकच्या मित्रांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMurderखून