कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयाचे पिशाच मानगुटीवर बसलेल्या पतीने बुधवारी पहाटे दुसऱ्या पत्नीचा गळा दाबून खून केला. उचगाव येथील जानकीनगर येथे हा प्रकार घडला. खूनानंतर पतीने स्वत: विळीने स्वत:च्या गळ्यावर वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. शिवाजी प्रभाकर ठोंबरे (वय ४0, रा. ) असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे शिवाजी पहिल्या पत्नीच्या खूनाच्या आरोपातून निर्दोष सुटला होता.
आरोपी शिवाजी ठोंबरे
मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी ठोंबरे हा उचगाव येथील जानकीनगर येथे रहात होता. त्याचा पाच महिन्यापूर्वीच कुर्डूवाडी, जि. सोलापूर येथील विद्या धायगुडे (वय २२) हिच्याशी दुसरा विवाह झाला होता. मात्र, विवाहानंतर तो पत्नीवर वारंवार चारित्र्याचा संशय घेत होता, तसेच तिला मारहाणही करीत असल्यामुळे विद्याने माहेरी कळविले होते. त्यानुसार विद्याचा भाउ प्रकाश दत्ता धायगुडे हा अहिल्यानगर, कुर्डूवाडी, जि. सोलापूर येथून तिला माहेरी नेण्यासाठी आला होता.
पत्नी माहेरी जाणार यामुळे चिडलेल्या शिवाजीने पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पत्नीच्या छातीवर बसून तिचा गळा दोन्ही हाताने दाबून तिचा खून केला. त्यानंतर त्याने स्वत: डाव्या हाताने विळीने शिरा कापून घेतल्या आणि गळ्यावर मारुन घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तो गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.विद्याचा भाउ प्रकाश धायगुडे याने गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. घटनास्थळी करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव, गांधीनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी, सहायक पोलिस निरिक्षक सुशांत चव्हाण, पोलिस उपनिरिक्षक एस. एस. पांचाळ यांनी भेट दिली आहे.पहिल्या पत्नीच्या खूनातून निर्दोषआरोपी शिवाजीने यापूर्वी पहिली पत्नी सुलभा हिचा २ जुलै २0१४ मध्ये चारित्र्याच्या संशयावरुनच डोक्यात लोखंडी पार मारुन जखमी केले होते. याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर पुन्हा त्याने १0 सप्टेंबर २0१४ रोजी राहत्या घरी चारित्र्याच्या संशय घेउन पत्नी सुलभा झोपली असता तिच्या डोक्यात भरलेले गॅस सिलिंडर मारुन खून केला होता. याबाबत गांधीनगर पोलिस ठाण्यात कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल होता. मात्र या गुन्ह्यात तो १५ नोव्हेबर २0१७ रोजी निर्दोष सुटला होता.