शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

कोल्हापूर : ‘राष्ट्रीय  ग्रामीण आरोग्य’च्या कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 5:35 PM

राष्ट्रीय  ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शिक्षण व अनुभवाच्या आधारे नियमित शासनसेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद करून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्दे‘राष्ट्रीय  ग्रामीण आरोग्य’च्या कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलनग्रामविकास विभागाची पदभरती थांबविण्याचा निर्णय दहा दिवसांत

कोल्हापूर : राष्ट्रीय  ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शिक्षण व अनुभवाच्या आधारे नियमित शासनसेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद करून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.कर्मचाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी २१ एप्रिल २०१८ रोजी बैठक घेऊन सकारात्मक आश्वासने दिली होती. त्यांची पूर्तता न केल्याबद्दल ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्रिसदस्यीय समिती स्थापण्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात येईल. त्यामध्ये संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांना निमंत्रित सदस्य म्हणून घेता येईल.

पहिली बैठक घेऊन त्यामध्ये एन. एच. एम.अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी / कर्मचारी यांच्या समायोजनाच्या दृष्टीने आरोग्य विभाग तसेच ग्रामविकास विभागाची पदभरती थांबविण्याचा निर्णय दहा दिवसांत घेण्यात येईल.समिती स्थापन झाल्यापासून तीन महिन्यांच्या कालावधीत एन. एच. एम.अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांच्या आर. आर.मध्ये बदल करून समायोजन करण्यात येईल, अशी सकारात्मक आश्वासने आरोग्यमंत्र्यांनी दिली होती.त्यामुळे यापूर्वीचे आंदोलन स्थागित करण्यात आले होते; परंतु दहा दिवसांचा कालावधी उलटला तरी आश्वासनांची पूर्तता न झाल्याने पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले आहे, असे जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गोसावी, राजकिरण सावडकर, नजिया खान, पूनम चौगले, अलका महाडिक, राणी रजपूत, कौसर बांदर, गौरी कुरुंदवाडे, संदीप पाटील, आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर