कोल्हापूर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांविरुद्ध आझाद हिंद सेनेच्या वतीने उभा केलेला स्वातंत्र्यलढा हा जगाच्या इतिहासात नोंद झालेला फार मोठा लढा आहे. नेताजींचे कार्य भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णपान आहे. युवकांनी नेताजींच्या विचारांचा वारसा आचरणात आणल्यास भारत निश्चितच महासत्ता होईल, असा विश्वास महापौर स्वाती यवलुजे यांनी व्यक्त केला.नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (मिरजकर तिकटी) येथे मंगळवारी सकाळी हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीने नेताजींच्या १२१ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अभिवादनाच्या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.याप्रसंगी महापौर स्वाती यवलुजे आणि ‘आसमा’चे अध्यक्ष संजय रणदिवे यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशभक्तिपर गीतांनी वातावरण देशप्रेमाने भारून गेले होते. कार्यक्रमाप्रसंगी ‘अमर रहे... अमर रहे... सुभाषबाबू अमर रहे...’ ‘इन्कलाब जिंदाबाद,’ ‘आझाद हिंद सेनेचा विजय असो,’ ‘क्रांतिकारकांचा विजय असो,’ अशा घोषणांनी चौकाचा परिसर दणाणून गेला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्मा क्रांती संस्थेचे कार्याध्यक्ष रामेश्वर पतकी यांनी नेताजींच्या कार्याचा आढावा घेऊन नेताजींच्या कार्याच्या स्मृती जागविल्या. संस्थेचे सेक्रेटरी पद्माकर कापसे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष मधुकर रामाणे यांनी क्रांतिकारकांच्या स्मृती सदैव आठवणीत राहाव्यात, यासाठी हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था नेहमीच अग्रभागी राहील, असे सांगून मनोगत व्यक्त केले.
हुतात्मा क्रांती संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष किसनराव कल्याणकर यांनी सुभाषचंद्र बोस चौक असे नामफलक महापालिकेने त्वरित उभा करावेत, अशी मागणी केली.
यावेळी उपमहापौर सुनील पाटील, माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, माजी नगरसेवक राजू हुंबे, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, माजी नगरसेवक आदिल फरास, बाबूराव चव्हाण, अजित सासने, सुरेश पोवार, अनिल कोळेकर, किशोर घाटगे, संभाजी साळुंखे, अशोक पोवार, महेश उरसाल, जयकुमार शिंदे, राहुल चौधरी, प्रशांत बरगे, श्रीकांत मनोळे, गुरुदत्त म्हाडगुत, बाबा सावंत, शंकरराव शेळके, सचिन मंत्री, सुमित खानविलकर यांच्यासह भागातील व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथील श्री नेताजी तरुण मंडळातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त विनय पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवाजी पेठेतील श्री नेताजी तरुण मंडळातर्फे नेताजी जयंती उत्साहातशिवाजी पेठेतील श्री नेताजी तरुण मंडळातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे संचालक विनय पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.यावेळी उदय अतकिरे, लालासाहेब गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे, राजेंद्र राऊत, शिवाजी पोवार, प्रदीप साळोखे, शिरीष पाटील, बॉबी राऊत, नंदू साळोखे, संतोष राऊत, अजिंक्य साळोखे, रवींद्र राऊत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.