शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कोल्हापूर : गोंविंद पानसरे हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 7:02 PM

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील दुसरा संशयित आरोपी व सध्या जामिनावर बाहेर असलेला डॉ. वीरेंद्र तावडे याचा पंचनाम्यावेळी जप्त केलेला पासपोर्ट संशयित आरोपीचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी येथील जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सोमवारी जमा केला.

ठळक मुद्देगोंविंद पानसरे हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ लावीरेंद्र तावडेचा पासपोर्ट न्यायालयात जमा : समीर पटवर्धन

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील दुसरा संशयित आरोपी व सध्या जामिनावर बाहेर असलेला डॉ. वीरेंद्र तावडे याचा पंचनाम्यावेळी जप्त केलेला पासपोर्ट संशयित आरोपीचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी येथील जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सोमवारी जमा केला.पानसरे हत्याप्रकरणाची सुनावणी बिले यांच्या न्यायालयात झाली. यावेळी अ‍ॅड. पटवर्धन यांनी युक्तिवाद केला. अ‍ॅड. पटवर्धन यांचे म्हणणे ऐकून याची पुढील सुनावणी दि. १७ मार्चला होणार असल्याचे बिले यांनी यावेळी स्पष्ट केले.अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी, पानसरे हत्याप्रकरणातील मुख्य संशयित व सध्या जामिनावर बाहेर असलेला समीर गायकवाड याच्यावर दोषारोप निश्चितीची (चार्जफ्रेम) सुनावणी ही सात मार्चला उच्च न्यायालयात होणार आहे, असा युक्तिवाद केला.

यावेळी अ‍ॅड. पटवर्धन यांनी, तावडेचा जप्त केलेला पासपोर्ट न्यायालयात यावेळी जमा केला. सुनावणीवेळी सरकारी वकील हजर नव्हते. सुनावणी झाल्यानंतर अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, पानसरे हत्याप्रकरणात संशयित डॉ. वीरेंद्र तावडेला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने जामीन दिला आहे. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातही तावडेला जामीन मिळावा, यासाठी पुण्याच्या सीबीआय न्यायालयात दुसऱ्यांदा अर्ज करणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी तावडेला जामीन मिळावा यासाठी न्यायालयात पहिल्यांदा अर्ज केला होता. न्यायालयाने तो जामीन फेटाळला होता.

 

 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर