कोल्हापूर : गेली अडीच वर्ष कुटूंबापासून दूर असलेल्या आणि कारागृहाच्या भिंतीआड आयुष्य कंठणाºया नऊ कैद्यांची कळंबा मध्यवर्ती कारागृहातून शुक्रवारी सुटका झाली. कारागृहाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडताच समोर स्वागतासाठी उभ्या असलेल्या आपल्या नातेवाईकांना पाहून सर्वांचाच कंठ भरुन आला. त्यांनी गळ्यात पडून आपल्या आनंदाश्रुंना वाट मोकळी करुन दिली. कारागृह प्रशासनाकडून वीस कैद्यांची यादी शासनाला सादर केली होती. त्यापैकी नऊ कैद्यांच्या सुटकेला शासनाने मंजूरी दिली. त्यानुसार गांधी जयंती निमित्त कारागृहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शुक्रवारी समारोप कार्यक्रमास सेवानिवृत्त कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते शिक्षा माफ झालेल्या कैद्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कैद्यांना गांधीच्या जिवनावरील पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी निवृत्त उपमहानिरीक्षक धामणे यांनी प्रत्येकाने आयुष्यात संयम पाळला पाहिजे. आपला अहंकार नडल्याने रागाच्या भारात गुन्हा घडून जातो. परंतू त्यांची शिक्षा तुमच्यासह कुटूंबालाही भोगावी लागले. या चक्रव्युहात संपूर्ण कुटूंब उध्दवस्थ होते. सुखान जगा, दूसऱ्यांना जगवा, अर्धी भाकरी खायाला नाही मिळाली तरी चालेल परंतु समाधानान जगा, मोकळ्या वातावरणात निवांत रहा असा मौलिक संदेश यावेळी दिला.यांची झाली सुटकामाया भीमराव कांबळे (रा. वय ५०, रा. बत्तीस शिराळा, जि. सांगली), त्यांचा मुलगा महेश (२८), विशाल रवींद्र वारे (३०), लाला नंदू मदने (४०, दोघे रा. वडूज, जि. सातारा), नितीन अग्रवाल ऊर्फ नीतेशकुमार भोलेनाथ विश्वकर्मा (४०, रा. दारूर-गुजरात), धनाजी घोडके, संतोष केशव चाळके (खंडाळा), संजय शहाजी क्षीरसागर (कोल्हापूर), बबनराव ज्ञानू शिंदे (सांगली)