शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

कोल्हापूर : प्राधिकरण नकोच, यावर ४२ गावे ठाम,पालकमंत्र्यांसोबत आठ दिवसांत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 11:21 AM

प्राधिकरणाला विरोध करणारे गावसभांचे ठराव पालकमंत्री चंद्रकांत पाटील व तिन्ही आमदारांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

ठळक मुद्देप्राधिकरण नकोच, यावर ४२ गावे ठाम, पालकमंत्र्यांसोबत आठ दिवसांत बैठकप्राधिकरण विरोधी कृती समिती गावोगावी जाऊन जनजागृती करणार

कोल्हापूर : गेल्या वर्षभरात प्राधिकरण म्हणजे काय आणि ते झाल्यानंतर काय अडचणी येणार हेच ग्रामस्थांना माहीत नाही. यासाठी ४२ गावांचा दौरा करून जनजागृती करू, पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची भेट घेऊन विरोध दर्शवू, एवढे करून सरकार दडपशाहीने प्राधिकरण लादणार असेल, तर जनहित याचिका दाखल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्राधिकरण विरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर प्राधिकरणाला विरोध करणारे गावसभांचे ठराव पालकमंत्री चंद्रकांत पाटील व तिन्ही आमदारांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला.प्राधिकरण विरोधी कृती समितीची बैठक करवीर पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी कृती समितीचे निमंत्रक व करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी होते.

प्रास्ताविकात वडणगेचे सरपंच सचिन चौगले म्हणाले, प्राधिकरणाच्या फायदे-तोट्यांची माहिती झाली असून, आता याला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला विकास पाहिजे पण विकासासाठी आम्ही भूमिहीन होणार असेल तर तसा विकासच नको. इतर ठिकाणी जमिनी घेतल्या त्या पडीक होत्या, आमच्या पिकाऊ जमिनी असल्याने त्या देवून भिकेला लागायचे का? असा सवाल केला.

गावठाण्यात आहेत तेवढीच घरे नियमित करून उर्वरित बांधकामे बेकायदेशीर ठरवून त्यावर दंड आकारणार. या दंडाच्या रकमेतून आमचा विकास करणार, आम्हाला लुटून कोण विकास करणार असेल, तर तो कदापि मान्य करणार नसल्याचा इशारा अशोक पाटील (शिंगणापूर) यांनी दिला.

प्रा. बी. जी. मांगले म्हणाले, कोणत्याही प्रश्नांचे सार्वत्रिकरण झाल्याशिवाय त्याची उकल होत नाही. जनहित याचिकेचा पर्याय सर्वांत शेवटचा आहे. तत्पूर्वी लोकप्रतिनिधींना निवेदने देऊच, पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ४२ गावांत जाऊन जनजागृती केली पाहिजे. तेथील लोकांना या रेट्यात सहभागी करून घेतले तरच प्राधिकरणविरोधात जनआंदोलन उभे राहील.

ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनाही या लढ्यात सहभागी करून घेऊया, अभ्यासू लोकांची समिती स्थापन करून प्राधिकरण का नको, आम्हाला काय हवे आहे, याचा आराखडा मंत्र्यांकडे चर्चेला जाताना हवा. जी. आर. कुलकर्णी (कोल्हापूर) यांनी विकासाच्या दृष्टीने प्राधिकरण कसे योग्य आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला जोरदार विरोध झाला.

प्राधिकरणामुळे जमिनी जाऊन भीक मागण्याची वेळ येईल, लोकांना भिकेला लावून कोण विकास साधणार असेल तर त्याला विरोधच राहील, असे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी ठणकावून सांगितले.शरद निगडे (नागदेववाडी), प्रकाश पाटील (नेर्ली), संदीप पाटील (वाशी), प्रताप साळोखे (कळंबा) यांनी मनोगत व्यक्त केले. शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे, अमर पाटील, कृष्णात धोत्रे, विश्वास कामिरे, आदी उपस्थित होते.दरम्यान, राजेंद्र सूर्यवंशी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. आठवड्याभरात याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन पाटील यांनी दिल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.

जमीन मालकांवर वॉचमनची वेळपिंपरी चिंचवड प्राधिकरणासारखे दिवास्वप्न दाखवले जाते. भूसंपादनातून ग्रामस्थांकडे पैसा आला, बंगला-गाड्या झाल्या पण कालांतराने पैसे संपले आणि हीच मंडळी ज्यांना जमिनी विकल्या त्यांच्या दारात वॉचमन म्हणून काम करण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे सचिन चौगले यांनी सांगितले.

‘लोकमत’चे अभिनंदनराज्यात ज्या शहरांत प्राधिकरण झाले, तेथील वस्तुस्थिती ‘लोकमत’ने अभ्यासपूर्णरित्या मांडले. प्राधिकरणाचा बुरखा फाडून सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याचे सांगत करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी, पंडित लाड (निगवे दुमाला), अशोक पाटील (शिंगणापूर) आदींनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले.

सूर्यवंशींचा सदस्यत्वाचा राजीनामात्या तालुक्याचे सभापती हे प्राधिकरण समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. पण प्राधिकरणाला ४२ गावांचा विरोध असेल, तर आपण जनतेसोबत राहू, असे सांगत करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर