कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज, मंगळवार सकाळपासून चुरशीने मतदान सुरु आहे. महाविकास आघाडी आणि भाजप एकमेकांविरोधात ताकदीने मैदानात उतरल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत शहरात एकूण २०.५७ टक्के मतदान झाले. शहरातील मतदान केंद्रावर नेत्यांनी भेटी देण्यास सुरुवात केली आहे. यातच मंगळवार पेठ परिसरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आले असता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. याप्रकारानंतर या परिसरातील वातावरण तणावपुर्ण बनले होते.मतदानकेंद्रावर सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली आहे. यातच नेतेमंडळींही मतदानकेंद्रावर जात परिस्थीतीचा आढावा घेत आहेत. मतदानकेंद्रावर नेते मंडळी येताच मोठी गर्दी होत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.दरम्यान मंगळवार पेठ परिसरातील मतदानकेंद्रावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह गेले होते. यावेळी याठिकाणी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देत त्यांनी या ठिकाणाहून पिटाळून लावले. याप्रकारानंतर याठिकाणची परिस्थिती तणावपुर्ण बनली होती.
Kolhapur North Assembly by-election: मंगळवार पेठेत चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 12:39 PM