Kolhapur North By Election: कदम यांच्या उमेदवारीवर काँग्रेसचा आक्षेप, छाननीत ठरला वैध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 01:00 PM2022-03-26T13:00:13+5:302022-03-26T13:00:45+5:30

कदम यांनी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर उमेदवार जाधव यांचे प्रतिनिधी संजय शेटे यांनी हरकत घेतली.

Kolhapur North By Election: Congress objection to BJP candidate Satyajit Kadam candidature, validated in scrutiny | Kolhapur North By Election: कदम यांच्या उमेदवारीवर काँग्रेसचा आक्षेप, छाननीत ठरला वैध

Kolhapur North By Election: कदम यांच्या उमेदवारीवर काँग्रेसचा आक्षेप, छाननीत ठरला वैध

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांवर शुक्रवारी झालेल्या छाननीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या उमेदवारी अर्जावरील प्रतिज्ञापत्रावर विरोधी काँग्रेसचे उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रतिनिधींनी जोरदार आक्षेप नोंदवला.

मात्र निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी कदम यांचा अर्ज वैध ठरविला. कदम समर्थकांची अस्वस्थता चांगलीच वाढली. छाननीत जयश्री जाधव यांच्यासह १७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. दोघांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले.

कदम यांनी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर उमेदवार जाधव यांचे प्रतिनिधी संजय शेटे यांनी हरकत घेतली. कदम यांनी नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेले शपथपत्र नोटरीच्या कायद्यानुसार होत नाही. शपथपत्रावरील नोटरीचा शिक्का गोल नसून अंडाकृती आहे. यामुळे कदम यांचा अर्ज नामंजूर करण्यात यावा, अशी हरकत घेतली.

यावर कदम यांचे वकील विनायक रणखांबे व सुनील कदम यांनी शेटे यांच्या हरकतीस लेखी उत्तर दिले. हरकत निवडणूक अर्ज त्यातील माहिती संबंधित नाही. नोटरी कायद्याप्रमाणेच केली आहे. हरकतीसोबत कोणताही कागदोपत्री पुरावा जोडलेला नाहीत. यामुळे कदम यांचा अर्ज वैध ठरवावा, असे उत्तर दिले.

पक्षाचा एबी फार्म दोघांना दिल्याने सीमा कदम यांचा एक आणि काँग्रेसेचे सचिन चव्हाण यांचे दोन अर्ज, सूचक दुसऱ्या मतदारसंघातील असल्याने यशवंत शेळके यांचा एक अर्ज वैध ठरला.

यांचे अर्ज वैध

जयश्री जाधव (इंडियन नॅशनल काँग्रेस), सत्यजित कदम (भारतीय जनता पार्टी), यशवंत शेळके (नॅशनल सोशालिस्ट पार्टी (युनायटेड)), विजय केसरकर (लोकराज्य जनता पार्टी), शाहीद शेख (वंचित बहुजन आघाडी), आसलम सय्यद (अपक्ष), सुभाष देसाई (अपक्ष), बाजीराव नाईक (अपक्ष), संभाजी भोसले (अपक्ष), मनीषा कारंडे (अपक्ष), अरविंद माने (अपक्ष), अजीज मुस्ताक (अपक्ष), करुणा मुंडे (अपक्ष), राजेश ऊर्फ बळवंत नाईक (अपक्ष), राजेश कांबळे (अपक्ष), संजय मागाडे (अपक्ष), संतोष बिसुरे (अपक्ष).

Web Title: Kolhapur North By Election: Congress objection to BJP candidate Satyajit Kadam candidature, validated in scrutiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.