Kolhapur North By Election: कदमांचे शक्तीप्रदर्शन, जाधव यांचा साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 05:37 PM2022-03-23T17:37:30+5:302022-03-23T17:42:35+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी शक्तीप्रदर्शन न करता साध्या पद्धतीने उमेदवारी ...

Kolhapur North By Election: Great show of strength by Satyajit Kadam, Jayashree Jadhav's candidature application filed in a simple manner | Kolhapur North By Election: कदमांचे शक्तीप्रदर्शन, जाधव यांचा साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज

Kolhapur North By Election: कदमांचे शक्तीप्रदर्शन, जाधव यांचा साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी शक्तीप्रदर्शन न करता साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबरमध्ये निधन झाल्याने जयश्री जाधव यांनी साधापणाने आपले दोन उमेदवारी अर्ज भरले. तर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी त्यांच्या सोबत उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री उदय सामंत, सहकार राज्यमंत्री बाळासाहेब पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे उपस्थित होते. तर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी आमदार प्रकाश आवाडे, जयंत पाटील, महेश जाधव, उत्तम कांबळे, आदी. उपस्थित होते.

गळ्यात भाजपचे भगवे स्कार्फ, नरेंद्र मोदींचा चेहरा दाखवणारे फलक, हालगी, घुमक्याचा ठेका अशा जल्लोषी वातावरणात भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन केले. दसरा चौकातून मिरवणूक काढून जिल्हाधिकरी कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आला.



तर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जाण्याकरिता काही मोजक्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बाळकृष्ण हवेली येथे बोलविण्यात आले होते. परंतु न सांगताही तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक मोठ्या संख्येने जमले होते. महिलांचाही त्यामध्ये समावेश होता.

Web Title: Kolhapur North By Election: Great show of strength by Satyajit Kadam, Jayashree Jadhav's candidature application filed in a simple manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.