Kolhapur North By Election: जाधव, कदम उद्या भरणार अर्ज, शक्तीप्रदर्शनासाठी जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 11:43 AM2022-03-22T11:43:11+5:302022-03-22T11:43:47+5:30

आतापर्यंत २९ जणांनी ५८ अर्ज नेले असून, एकाच उमेदवाराने सोमवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्याची मुदत २४ पर्यंत आहे.

Kolhapur North By Election: Jayashree Jadhav, Satyajit Kadam to file application tomorrow | Kolhapur North By Election: जाधव, कदम उद्या भरणार अर्ज, शक्तीप्रदर्शनासाठी जय्यत तयारी

Kolhapur North By Election: जाधव, कदम उद्या भरणार अर्ज, शक्तीप्रदर्शनासाठी जय्यत तयारी

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरसाठी काँग्रेसतर्फे जयश्री जाधव आणि भाजपतर्फे सत्यजित कदम हे बुधवारी एकाच दिवशी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे या दिवशीच शक्तीप्रदर्शन करण्यासाठी दोन्ही पक्ष सज्ज झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर कोल्हापूरला परतले आहेत. जयश्री जाधव यांना आमदार करूनच ‘मातोश्री’वर घेऊन येऊ, असा शब्द त्यांनी ठाकरे यांना दिला आहे.

आतापर्यंत २९ जणांनी ५८ अर्ज नेले असून, एकाच उमेदवाराने सोमवारी अर्ज दाखल केला. यासाठी अर्ज भरण्याची मुदत २४ पर्यंत आहे. जयश्री जाधव या बुधवारी अर्ज दाखल करणार असून, यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र आणत शक्तीप्रदर्शन करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कंबर कसली आहे.

दुसरीकडे सत्यजित कदम यांच्या अर्ज दाखल करण्याच्या मिरवणुकीला दहा वाजता दसरा चौकातून सुरूवात होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करण्याचे नियोजन असून, सहकारी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

Web Title: Kolhapur North By Election: Jayashree Jadhav, Satyajit Kadam to file application tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.