कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणूकीतकाँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी मतमोजणीच्या २२ व्या फेरीअखेर त्यांचेच स्वर्गीय पती चंद्रकांत जाधव यांचे गेल्या निवडणूकीतील मताधिक्क्य मागे टाकले. जयश्री जाधव यांना आतापर्यंत १६ हजार ३३१ मतांची आघाडी आहे.गेल्या निवडणूकीत काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव हे १५१९९ मतांनी विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता. स्वर्गीय जाधव यांना ९१ हजार ५३ (५१.९७ टक्के) मते मिळाली होती. तर क्षीरसागर यांना ७५ हजार ८५४ (४३.२९ टक्के) मते मिळाली होती. जयश्री जाधव यांना विसाव्या फेरीअखर एकूण ७६ हजार २०७ मते मिळाली आहेत. तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ६० हजार ९२५ मते मिळाली आहेत. या फेरीअखेरचे जाधव यांचे मताधिक्कय १५ हजार ४३२ आहे. म्हणजे जयश्री जाधव यांनी आपल्या पतीचेच मताधिक्क्य विसाव्या फेरीअखेर मागे टाकले.पहिल्या फेरीपासून काँग्रेसच्या जयश्री जाधव या आघाडीवर होत्या. भाजपचे सत्यजीत कदम यांनी मतमोजणीच्या काही फेऱ्यांमध्ये अधिक मतं घेतली. आठव्या, नवव्या, दहाव्या फेरीत कदमांना अधिक मतं मिळाली. मात्र त्यानंतरच्या सगळ्या फेऱ्यांमध्ये जाधवांनी जास्त मतं घेत आघाडी घेतली.
Kolhapur North By Election Result: 'अण्णां'चे मताधिक्क्य जयश्री वहिनींनी मागे टाकले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 1:07 PM