शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

Kolhapur North By Election Result: करूणा मुंडेंना मिळाली 'इतकी' मते, ‘नोटा’ चा पर्याय तिसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 10:55 AM

कोल्हापूर : महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये अत्यंत चुरशीने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूक झाली. त्याच्या मतमोजणीमध्ये शनिवारी ...

कोल्हापूर : महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये अत्यंत चुरशीने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक झाली. त्याच्या मतमोजणीमध्ये शनिवारी नवव्याफेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना पहिल्या क्रमांकावर होत्या. भाजपचे उमेदवार सत्यजित कदम दुसऱ्या क्रमांकावर होते. इतर पक्ष आणि अपक्ष असे तेरा उमेदवार रिंगणात होते. मात्र, ६१८ मतांसह ‘नोटा’ चा पर्याय तिसऱ्या क्रमांकावर राहिला. करूणा मुंडे, विजय केसरकर, राजेश नाईक हे ५७ मतांवर आहेत.राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदाम आणि प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. त्यात चौथ्याफेरी अखेर एकूण ६५९४२ मतांची मोजणी झाली. त्यात जयश्री जाधव यांना ३६७३७ मते, सत्यजीत कदम यांना २७७३८, तर ‘नोटा’ पर्यायाला ६१८ मते मिळाली. या मतदारसंघात गेल्या निवडणुकीमध्ये ‘नोटा’ चा पर्याय तिसऱ्या क्रमांकावर होता. अन्य उमेदवारांना यशवंत शेळके (१३१), विजय केसरकर (५७), शाहीद शेख (२२३), सुभाष देसाई (५०), बाजीराव नाईक (१८), भारत भोसले (२१), मनिषा कारंडे (१५), अरविंद माने (२२), अजिज मुस्ताक (२४), राजेश नाईक (५७), राजेश कांबळे (५१), संजय मागाडे (१२३) अशी मते मिळाली आहेत.

करूणा मुंडे यांनीही या निवडणूक रिंगणात उडी घेतल्यानंतर महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते. प्रचारसभेदरम्यान आपल्याला धमक्या आल्याच्या आरोप त्यांनी केला होता. मात्र ही लढत प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात झाली. राज्यातील सर्वच दिग्गज नेत्यांनी प्रचारसभांना हजेरी लावल्याने जिल्हयातील राजकीय वातावरण तापले होते. मतदानानंतर महाविकास आघाडी व भाजपकडूनही विजयी दावा करण्यात आला. मात्र आज निकालानंतर मात्र काँग्रेसनेच आघाडी घेतल्याचे दिसून आले. सध्या हाती आलेल्या निकालानुसार  जयश्री जाधव 11239 मतांनी आघाडीवर आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकResult Dayपरिणाम दिवसkolhapur-north-acकोल्हापूर उत्तर