शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

Kolhapur North By Election Result: कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडीनं उधळला विजयाचा गुलाल; जयश्री जाधव ठरल्या पहिल्या महिला आमदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 1:21 PM

पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर कोल्हापूर पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं होते. मात्र या निवडणुकीत मविआनं बाजी मारली आहे.

कोल्हापूर – गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या रणांगणात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव(Jayshree Jadhav) यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. भाजपाने या निवडणुकीत सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली होती. मागील महिनाभरापासून कोल्हापूरात भाजपाविरुद्धमहाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू होत्या. त्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराने बाजी मारली आहे.

कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २६ व्या फेरी अखेर ९६ हजार २२६ मतं तर भाजपाचे सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली. जवळपास १८ हजारांहून अधिक मताधिक्यांनी काँग्रेसचा विजय झाला आहे. जयश्री जाधव यांच्या विजयानंतर कोल्हापूरात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली जात आहे. याठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विजयाचा जल्लोष सुरू केला. कोल्हापूर उत्तरची जागा राखण्यात काँग्रेसला यश आले आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर कोल्हापूर पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं होते.

विजयी उमेदवार जयश्री जाधव काय म्हणाल्या?

चंद्रकांत जाधव यांनी विकासाचं जे स्वप्न पाहिलं होते. परंतु दुर्दैवाने नियतीने त्यांचं स्वप्न अर्धवट राहिले. पत्नी म्हणून त्यांचे स्वप्न पूर्ण करणे माझं कर्तव्य होते. आज कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला आहे. भाजपानं मोठे मन दाखवून पोटनिवडणूक टाळायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. कोल्हापूर पुरोगामी विचारांचा बालेकिल्ला असल्याचं दाखवून दिले. महालक्ष्मीची कृपा असल्याने महिला आमदार कोल्हापूरातून निवडून आली आहे. कोल्हापूरच्या जनतेला हा विजय समर्पित आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया जयश्री जाधव यांनी व्यक्त केला.

संजय राऊत काय म्हणाले?

कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात भोंगे, हनुमान चालीसा असं राजकारण सुरू केले. मात्र कोल्हापूरच्या जनतेने विरोधकांचे भोंगे खाली उतरवला आहे. समाजात तणाव निर्माण करण्याचं काम कोल्हापूरच्या जनतेने नाकारलं आहे. कोल्हापूरच्या उत्तर जनतेने महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करून दाखवलं आहे. भोंग्याचे राजकारण आजच संपलं आहे असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा