कोल्हापूर : कुस्तीत सरावातील सातत्य महत्वाचे आहे. त्याकरीता दिवसातील जास्त वेळ कुस्तीला द्यावा. तरच यश आपल्या आवाक्यात येईल. प्रशिक्षकांच्या सुचना लढतीमध्ये बहुउपयोगी ठरतात. त्यामुळे सरावावर लक्ष केंद्रीत करा. त्यातूनच आॅलंपिकचे पदक जिंकता येईल. असा सल्ला आॅलंपिकवीर अर्जुनवीर पुरस्कार विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने दिला.
तो शुक्रवारी (दि. ३) रात्री उशिरा कोल्हापूरातील राम सारंग यांच्या राष्ट्रकुल कुस्ती संकुलास सदीच्छा भेट दिली. त्याप्रसंगी प्रशिक्षणार्थी मल्लांशी संवाद साधताना बोलत होता.
यावेळी राम सारंग म्हणाले, योगेश्वर दत्त हा ४२ किलो वजनी गटातक पुणे येथे कॅडेट शिबीरात होता. त्यावेळी त्याची गुणवत्ता पाहीली होती. पुढे हाच योगेश्वरने देशासाठी आॅलंम्पिक मध्ये पदक मिळवून दिले. हा आदर्श आजच्या मल्लांनीही घ्यावा. असे आवाहन केले. यावेळी योगेश्वरने सरावातील काही उणीवा दाखवत मार्गदर्शन केले.यावेळी आंध्रकेसरी जाफर, आंतरराष्ट्रीय मल्ल शिवाजी पाटील (आमशीकर) गुलाब आगरकर यांच्यासह संकुलातील सर्व कुस्तीगीर उपस्थित होते.