दीपक जाधव
कोल्हापूर : पोलीस मुख्यालयात मंगळवारी पोलीस अधीक्षक संजय मोहिते याच्या प्रयत्नातून महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासाठी पहिले पाळणाघर सुरु होणार आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील विशेष उपस्थिती असणार आहे.
मूल थोडे मोठे झाले की स्त्रियांना त्यांना पाळणाघरात ठेवून नोकरीवर जावे लागते. नोकरदार महिलांसाठी मुलांची सुरक्षितता महत्त्वाची ठरते .नोकरी निमित्य घरापासून लांब असणे, घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती नसणे, पती-पत्नी दोघेही नोकरीला असणे अशा कारणांमुळे मुलांचे योग्य संगोपन होण्यासाठी त्यांना पाळणाघरामंमध्ये ठेवण्याचा पर्याय स्वीकारला जातो.
मात्र महिला पोलीस कर्मचाऱ्यांना बारा-बारा तास कर्तव्य बजावावे लागत असल्याने, व त्याच्या नोकरीची वेळ नक्की नसल्याने मुलांना बाहेर पाळणाघरात ठेवण्याचेही अड़चणीचे ठरते. यावर उपाय म्हणून पोलीस मुख्यालयात महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासाठी पहिले पाळणाघर सुरु होणार आहे.
आपल्या बाळाचे संगोपन चांगल्या रिते व्हावे त्याची योग्य काळजी घ्यावी हा प्रयत्न प्रत्येक आईचा असतो, मात्र महिला पोलीस कर्मचा:यांना बारा - बारा तास कर्तव्यावर रहावे लागत असते. त्यामुळे त्यांच्या लहान मुलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आणि ही गेरसोय होऊ नये म्हणून पोलीस मुख्यालयात महिला पोलिसांच्या मुलासाठी पाळणाघर सुरू होत आहे.
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात एकूण ३० पोलीस ठाणी असून याठिकाणी महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांना १२ तास कर्तव्य बजावावे लागते. याचबरोबर रोज होणारे मोर्चे, आंदोलने, आरोप पार्टी, सण, उत्सव जयंती यामुळे काहीवेळा जास्त वेळ घराबाहेर रहावे लागते. त्यावेळी मुलाकडे दुर्लक्ष होते. यावर उपाय म्हणून पाळणाघर व्हावे अशी मागणी महिला कर्मचाऱ्यानी दरबारात केली होती.
महिला कर्मचाऱ्यानी केलेल्या मागणी नुसार पोलीस मुख्यालयात मंगळवारी पाळणाघर सुरु करण्यात येणार असून, त्यासाठी २-३ ठिकाणाची पाहणी केली आहे.त्यासाठी आवश्यक त्या सोई सुविधा उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी दोन महिला पोलिस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. संजय मोहिते.पोलीस अधीक्षक कोल्हापूर.